गृह मंत्रालय
इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026, मोदी सरकारने साध्य केलेल्या महत्त्वपूर्ण टप्प्यांवर आधारित नवीन युगातील नेतृत्वासाठी भारताला सज्ज करत आहे - केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह
जागतिक नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांच्या सर्वात मोठ्या संमेलनाचे आयोजन करून भारत, सार्वत्रिक आनंद आणि कल्याणाच्या मंत्रासह नवीन युगासाठी नैतिक दिशा निश्चित करत आहे
ही शिखर परिषद म्हणजे भारताने जगाला दिलेले वचन आहे की देश मानवजातीच्या प्रगतीच्या प्रवासाला त्याची अपार नवोन्मेषी शक्ती आणि लोकशाहीच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक मुळांच्या माध्यमातून चालना देत राहील
अनेकांसाठी भविष्य अदृश्य असेल मात्र भारताने आधीच आपल्या नियतीवर नियंत्रण मिळवले आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद-2026 मध्ये मांडलेला भारताचा एआय दृष्टिकोन ‘MANAV’ मानवतेला सुरक्षित भविष्याकडे नेतो
इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद-2026 मध्ये प्रदर्शित केलेला ‘सर्वम’ एआय, उद्याचा काळ भारताचा का आहे हे दर्शवितो
22 भारतीय भाषांमध्ये एआय सोल्यूशन्स उपलब्ध करून देत हे तंत्रज्ञान प्रत्येकाच्या हातापर्यंत पोहोचेल याची खात्री देत असून पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारताच्या दृष्टिकोनासाठी मार्ग प्रशस्त करत आहे
Posted On:
19 FEB 2026 10:57PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी 2026
इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026, मोदी सरकारने साध्य केलेल्या महत्त्वपूर्ण टप्प्यांवर आधारित नवीन युगातील नेतृत्वासाठी भारताला सज्ज करत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे.
एक्स या समाज माध्यमावरील संदेशांच्या मालिकेत, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, "इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद - 2026 मोदी सरकारने साध्य केलेल्या महत्त्वपूर्ण टप्प्यांवर आधारित नवीन युगातील नेतृत्वासाठी भारताला सज्ज करत आहे. जागतिक नेते आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांच्या सर्वात मोठ्या संमेलनाचे आयोजन करून, भारत सार्वत्रिक आनंद आणि कल्याणाच्या प्राचीन मंत्रासह नवीन युगासाठी नैतिक दिशा निश्चित करतो.”
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, “इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद-2026” ही मानवजातीच्या प्रगतीच्या प्रवासालाअपार नवोन्मेषी शक्ती आणि लोकशाहीच्या खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक मुळांच्या माध्यमातून सातत्याने गती देण्याची भारताची जगाला दिलेली हमी आहे. अनेकांसाठी भविष्य अजून अनिश्चित असू शकते; मात्र भारताने आपल्या नियतीची धुरा आधीच हाती घेतली आहे.”
केंद्रीय गृहमंत्र्यांनी पुढे सांगितले की, “इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद-2026”मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली ‘भारताची एआय दृष्टी – मानव’ (एमएएनएव्ही) ही संकल्पना मानवजातीला सुरक्षित आणि सक्षम भविष्याच्या दिशेने नेणारी आहे. नैतिकता, उत्तरदायित्व, राष्ट्रीय डेटा सार्वभौमत्व, सर्वांसाठी उपलब्धता आणि विश्वसनीय प्रणाली या तत्त्वांवर आधारित ही दृष्टी पुढील सभ्यतागत झेपेसाठी जगाला सज्ज करत आहे.”
अमित शाह यांनी असेही नमूद केले की, “इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषद-2026”मध्ये सादर करण्यात आलेल्या ‘सर्वम एआय’ उपक्रमामुळे उद्याचा काळ भारताचा का आहे, हे अधोरेखित होते. 22 भारतीय भाषांमध्ये अत्याधुनिक एआय उपाय उपलब्ध करून देत हा उपक्रम तंत्रज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवतो. यामुळे ‘विकसित भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाला बळ मिळत असून, तंत्रज्ञान हा नागरिकांचा विश्वासार्ह सहकारी ठरत आहे.
सोनाली काकडे/श्रद्धा मुखेडकर/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2230547)
अभ्यागत कक्ष : 5