पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी त्यांना वाहिली आदरांजली

Posted On: 19 FEB 2026 8:48AM by PIB Mumbai

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, धोरणी नीतीज्ञ आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना  आदरांजली वाहिली आहे.

शिवाजी महाराजांचे धैर्य आजही प्रेरणा देते, त्यांचे सुशासन आपल्यासाठी मार्गदर्शक ठरते, आणि त्यांची न्याय आणि स्वाभिमानाची भावना आजही समाजाला बळकटी देते,असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी नेहमीच प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणाला इतर सर्व गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाचे मानले आणि त्यांच्या संरक्षणासाठी स्वतःला पूर्णपणे समर्पित केले; यावर पंतप्रधानांनी भर दिला. या वचनबद्धतेमुळेच त्यांचे जीवन भारताच्या पिढ्यानपिढ्यासाठी एक पथदर्शी दीपस्तंभ राहिले आहे.

आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे:

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त, आपण दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, धोरणी नीतीज्ञ आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते यांना आदरांजली वाहत आहोत.

त्यांचे शौर्य आपल्याला प्रेरणा देवो, त्यांचे सुशासन आपल्यासाठी मार्गदर्शन करो आणि न्याय व स्वाभिमानाची त्यांची भावना आपल्या समाजाला अधिक सक्षम करो.

<

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त, दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, अनन्यसाधारण रणनीतीज्ञ आणि स्वराज्याचे पुरस्कर्ते अशा महान व्यक्तिमत्त्वाला आम्ही साष्टांग प्रणाम करत आहोत.
त्यांचे शौर्य आपल्याला प्रेरणा देईल, त्यांचे सुशासन आपल्यासाठी मार्गदर्शक ठरेल आणि न्याय व स्वाभिमानाची त्यांची भावना आपल्या समाजाला अधिक सक्षम करेल.”

एका संस्कृत श्लोकाचा उल्लेख करत, पंतप्रधान मोदींनी आपल्या दुसऱ्या ट्विटवर  लिहिले आहे:

“छत्रपति शिवाजी महाराजांनी संपूर्ण जनतेच्या कल्याणाला सदैव सर्वात महत्त्वाचे मानले आणि त्यांच्या संरक्षणासाठी स्वत:ला समर्पित  केले.  त्यामुळे त्यांचे जीवनदर्शन आजही भारतवर्षासाठी एक पथमार्गदर्शी दीपस्तंभ  राहिले आहे.”

गोपायितारं दातारं धर्मनित्यमतन्द्रितम्।

अकामद्वेषसंयुक्तमनुरज्यन्ति मानवाः।।”

***

NehaKulkarni/SampadaPatgaonkar/DineshYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2230118) अभ्यागत कक्ष : 16