पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवाशक्ती आणि तांत्रिक प्रगतीचे द्योतक म्हणून एआय इम्पॅक्ट समिटचे कौतुक करत एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे
Posted On:
16 FEB 2026 2:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 फेब्रुवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एआय इम्पॅक्ट समिटच्या निमित्ताने जगभरातील प्रमुख नेते, नवोन्मेषक आणि तज्ञ भारतात आल्याबद्दल अभिमानाची भावना व्यक्त केली आहे. हा कार्यक्रम म्हणजे एक ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले की ही परिषद म्हणजे भारताची युवा शक्ती आणि आंतरराष्ट्रीय तांत्रिक परिदृश्यावर उदयाला येत असलेले भारताचे स्थान यांचे एक स्पष्ट प्रतिबिंब आहे.
पंतप्रधानांनी एक्स समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये लिहिले आहे:
इंडिया ए आय समिटमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक भारतात येत आहेत ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. यामुळे आपल्या देशातील युवकांच्या सामर्थ्याची झलक देखील दिसून येते. या संधीमुळे हे देखील सिद्ध होत आहे की आपला देश विज्ञान आणि तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करत आहे आणि त्याचवेळी जागतिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.
दाने तपसि शौचं च विज्ञानं विनये नये।
विस्मयो न हि कर्तव्यो बहुरत्ना वसुन्धरा।।“
* * *
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2228638)
अभ्यागत कक्ष : 20
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam