माहिती आणि प्रसारण मंत्रालय
युरोपियन चित्रपट बाजार 2026 मध्ये महाराष्ट्राच्या चित्रपट उद्योगाला राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडून पाठबळ
महाराष्ट्राने युरोपियन चित्रपट बाजार बर्लिनमध्ये चित्रपट सृष्टी, मराठी चित्रपट आणि जागतिक सहकार्याच्या संधीचे सादरीकरण केले
Posted On:
15 FEB 2026 4:21PM by PIB Mumbai
माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाकडून युरोपियन चित्रपट बाजार 2026 मध्ये महाराष्ट्र प्रतिनिधी मंडळास सहभागी होण्यास आवश्यक सुविधा पुरवण्यात आली. हा कार्यक्रम बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बर्लिन येथे पार पडला.
युरोपियन चित्रपट बाजार हा चित्रपट वित्तपुरवठा, विक्री, वितरण आणि आंतरराष्ट्रीय सहनिर्मितीसाठी जगातील सर्वात प्रभावी व्यासपीठांपैकी एक आहे. या व्यासपीठावर जगभरातील अग्रगण्य निर्माते, स्टुडिओ, विक्री एजंट आणि धोरणकर्ते एकत्र येतात. युरोपियन फिल्म मार्केट राष्ट्रीय प्रदर्शनांसाठी आणि धोरणात्मक उद्योग संलग्नतेसाठी उच्च प्रभावी मंच उपलब्ध करून देतो, ज्यामुळे अर्थपूर्ण सहकार्य आणि जागतिक बाजारपेठेत प्रवेश सुनिश्चित होतो.

हा सहभाग भारत पर्व या व्यासपीठाचा एक भाग होता. भारत पर्व वेव्हज बाजार या संस्थेद्वारे सादर केले गेले असून, त्याद्वारे भारताची सर्जनशील क्षमता आणि उद्योगक्षमता जागतिक प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करण्यावर भर दिला जातो.
महाराष्ट्र प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व माहिती व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले. प्रतिनिधी मंडळामध्ये किरण कुलकर्णी (सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग), महेश वाव्हाळ (उपसचिव, सांस्कृतिक कार्य विभाग), स्वाती म्हसे पाटील (व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र फिल्म स्टेज & सांस्कृतिक विकास महामंडळ लिमिटेड), प्रशांत सजानिकार (संयुक्त व्यवस्थापकीय संचालक), सुचित्रा देशपांडे (विशेष कर्तव्य अधिकारी), मंगेश राऊल (सांस्कृतिक समन्वय अधिकारी) आणि चित्रपट निर्माता मनोज कदम यांचा समावेश होता.

सादरीकरणादरम्यान, महाराष्ट्र फिल्म स्टेज आणि सांस्कृतिक विकास महामंडळ लिमिटेडने महाराष्ट्राच्या चैतन्यशील चित्रपट सुष्टीची माहिती दिली आणि राज्याला चित्रपट निर्मिती, आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती आणि सांस्कृतिक देवाणघेवाणासाठी जागतिक केंद्र म्हणून स्थापन करण्याच्या धोरणात्मक उद्दिष्टाची माहिती अधोरेखित केली.
सादरीकरणादरम्यान, दादासाहेब फाळके चित्रनगरी मुंबई मधील जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात आला. हे एक समग्र उत्पादन केंद्र आहे, जे संपूर्ण चित्रपट निर्मिती पाठबळ देण्यासाठी तयार केले गेले आहे. या ठिकाणी उद्देशानुरूप स्टुडिओ, बाह्य सेट्स, पोस्ट-प्रॉडक्शन सुविधा आणि तांत्रिक पायाभूत सुविधा एकत्र उपलब्ध आहेत.

प्रतिनिधी मंडळाने मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्जनशील आणि व्यावसायिक क्षमतांवर प्रकाश टाकला, तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये तिच्या वाढत्या उपस्थितीवर भर दिला. चर्चेत जागतिक सहनिर्मिती संधींचा विस्तार, प्रतिभा देवाणघेवाण आणि चित्रपट पर्यटन यावर लक्ष केंद्रित केले गेले, तसेच स्थानिक कथाकथनाला जागतिक बाजारपेठेतील बदलत्या ट्रेंडशी अनुरूप कसे ठेवता येईल यावर चर्चा करण्यात आली.
प्रतिनिधी मंडळाने महाराष्ट्राची प्रगत धोरणात्मक संरचना, आर्थिक सहाय्य यंत्रणा आणि चित्रपट निर्मात्यांना अनुकूल वातावरण हे आंतरराष्ट्रीय सहकार्य सुलभ करणारे मुख्य घटक म्हणून मांडले. त्यांनी राज्याची जागतिक भागधारकांसोबत भागीदारी करण्यास आणि परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यास तयार असल्याचे अधोरेखित केले, जे मजबूत संस्थात्मक पाठबळ आणि उत्पादनासाठी तयार पायाभूत सुविधांवर आधारित आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय भागीदारी विकसित करण्यात आणि भारताच्या जागतिक चित्रपट बाजारपेठांमध्ये उपस्थिती बळकट करण्यात आपली वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली.
***
अंबादास यादव/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2228433)
अभ्यागत कक्ष : 18