पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून महान समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना जयंतीनिमीत्त अभिवादन
Posted On:
15 FEB 2026 2:49PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले. “सत्य, अहिंसा आणि उच्च नैतिक मूल्यांचा संदेश प्रसारित करून त्यांनी समाजात नवचेतना निर्माण केली. त्यांचे प्रेरणादायी जीवन देशातील जनतेला सदैव मार्गदर्शन करत राहील,” असे मोदी यांनी म्हटले.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“महान समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः नमन. सत्य, अहिंसा आणि उच्च नैतिक मूल्यांचा संदेश देत त्यांनी समाजात नवचेतना निर्माण केली. त्यांचे प्रेरणादायी जीवन सदैव देशवासियांना मार्गदर्शन करत राहील.
जय सेवालाल!”
***
सुषमा काणे/नितीन गायकवाड/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2228374)
अभ्यागत कक्ष : 19