पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

हेरथ पोष्टे निमित्त पंतप्रधानांकडून काश्मीरी पंडित बांधवांना शुभेच्छा

Posted On: 15 FEB 2026 8:30AM by PIB Mumbai


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरी पंडित समुदायाच्या समृद्ध परंपरांचे प्रतिबिंब असलेल्या पवित्र हेरथ पोष्टे या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या. या पवित्र प्रसंगी प्रत्येकाच्या आयुष्यात आरोग्य आणि समृद्धी लाभो, असे पंतप्रधान म्हणाले. या सणाप्रसांगी यशाच्या नव्या वाटा खुल्या होवोत आणि प्रत्येक घर आनंद व समाधानाने भरून जावो, अशी प्रार्थना पंतप्रधानांनी व्यक्त केली.
एक्स या सामाजिक माध्यमांवरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
हेरथ पोष्टे!
हा पवित्र सण आपल्या काश्मीरी पंडित समुदायाच्या समृद्ध परंपरांचे दर्शन घडवतो. या पवित्र प्रसंगी प्रत्येकाच्या आयुष्यात आरोग्य आणि समृद्धी लाभो, अशी मी प्रार्थना करतो. या सणामुळे यशाच्या नव्या वाटा खुल्या होवोत आणि प्रत्येक घर आनंद व समाधानाने भरून जावो.

***

अंबादास यादव/राज दळेकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2228324) अभ्यागत कक्ष : 9