पंतप्रधान कार्यालय
पूर्व नागालँडच्या विकासाला गती देणाऱ्या ऐतिहासिक कराराची पंतप्रधानांनी केली प्रशंसा
प्रविष्टि तिथि:
06 FEB 2026 9:29AM by PIB Mumbai
पूर्व नागालँडच्या विकासाच्या वाटचालीला लक्षणीयरीत्या चालना देणाऱ्या एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे.
यासंदर्भात केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी लिहिलेला संदेश सामायिक करताना पंतप्रधानांनी ‘एक्स’वर व्यक्त केलेला प्रतिसाद,
“हा खरोखरच एक ऐतिहासिक करार असून, यामुळे विशेषतः पूर्व नागालँडच्या विकासाच्या वाटचालीला गती मिळणार आहे. या करारामुळे तिथल्या जनतेसाठी संधी आणि समृद्धीचे नवे मार्ग खुले होतील, याची मला खात्री आहे. यातून ईशान्य भारतातील शांतता, प्रगती आणि सर्वसमावेशक विकासासाठी असलेली आमची दृढ वचनबद्धता दिसून येते."
***
नितीन फुल्लुके / तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2224294)
आगंतुक पटल : 77
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam