भारतीय निवडणूक आयोग
azadi ka amrit mahotsav

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी नियुक्त होणाऱ्या केंद्रीय निरीक्षकांना भारतीय निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन

Posted On: 05 FEB 2026 7:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026

भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) आज आसाम, केरळ, पुडुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्त होणाऱ्या सामान्य, पोलीस आणि खर्च निरीक्षकांसाठी मार्गदर्शन बैठकांचे आयोजन केले.

एकूण 1,444 अधिकारी, त्यामध्ये 477 सामान्य निरीक्षक, 451 पोलीस निरीक्षक आणि 516 खर्च निरीक्षक यांना या मार्गदर्शन बैठकींसाठी बोलावण्यात आले आहे. या बैठका 2 दिवसांमध्ये 3 सत्रांमध्ये, म्हणजेच फेब्रुवारी 5 आणि 6, 2026 रोजी आयआयआयडीईएम, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार तसेच निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंग संधू आणि डॉ.विवेक जोशी यांनी केंद्रीय निरीक्षकांना मार्गदर्शन केले.

आयोगाने निरीक्षकांसोबत शंका-निरसन सत्रात संवादही साधला. आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या 5 निवडणूक होणाऱ्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्या तयार करणे आणि निवडणूक प्रक्रियेचे संचालन या विविध बाबींवर निरीक्षकांना माहिती दिली.

निरीक्षकांना मतदान केंद्रांना भेट देण्याच्या तसेच मतदारांच्या सोयीसाठी आयोगाने हाती घेतलेल्या अलीकडील उपक्रमांची अंमलबजावणी होत आहे की नाही याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या, विशेषतः खात्रीपूर्वक किमान सोयीसुविधा (एएमएफ्स) उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.


सुवर्णा बेडेकर/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2224044) अभ्यागत कक्ष : 11