पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्र सरकारने लागवड केलेल्या औषधी वनस्पतींच्या मूळ प्रमाणपत्राच्या वितरणासाठी डिजिटल पोर्टलचा आरंभ केला

Posted On: 05 FEB 2026 5:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2026

केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण या वैधानिक संस्थेने  एक डिजिटल पोर्टल विकसित आणि कार्यान्वित केले असून त्यामाध्यमातून लागवड केलेल्या औषधी वनस्पतींसाठी 'प्रवेश आणि लाभ वाटप' सवलती मिळवू इच्छिणाऱ्या  भागधारकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सुलभरीत्या मूळ प्रमाणपत्रांचे वितरण केले जाईल.

हे पोर्टल अर्जांसंबंधी आवश्यक प्रक्रिया आणि मूळ प्रमाणपत्र वितरणाचे काम एकल खिडकी स्वरूपात संपूर्ण ऑनलाइन प्रणाली म्हणून कार्य करते 

https://absefiling.nbaindia.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन या पोर्टलची सेवा घेता येईल. 

जैवविविधता (सुधारणा) कायदा 2023 संसदेत अधिनियमित झाला असून लोकसभेत 25 जुलै  2023 रोजी तर राज्य सभेत 1 ऑगस्ट  2023 रोजी संमत झाला. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने 2024 आणि  2025 मध्ये जैवविविधता नियमांची अधिसूचना जारी केली.

सुधारित कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी आयुष क्षेत्र, बियाणे क्षेत्र आणि संशोधन संस्था यांच्यासह इतर भागधारकांच्या गटांमधील प्रक्रियात्मक आवश्यकता पूर्ण करण्याच्या दृष्टीने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने  2024 आणि  2025 मध्ये जैवविविधता नियम अधिसूचित केले.

सुधारित नियमांनुसार, एका निर्दिष्ट डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे लागवड केलेल्या औषधी वनस्पतींसाठी मूळ प्रमाणपत्रांची इलेक्ट्रॉनिक निर्मिती करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2223911) अभ्यागत कक्ष : 6