माहिती आणि प्रसारण मंत्रालय
गेल्या 5 वर्षात सीबीएफसीने 70 हजारांहून अधिक चित्रपट केले प्रमाणित ; केवळ कायदेशीर उल्लंघन केलेल्या प्रकरणांत सुचवली कपात
Posted On:
04 FEB 2026 7:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2026
केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन,CBFC), ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक वैधानिक संस्था आहे. ही संस्था सिनेमॅटोग्राफ कायदा 1952, सिनेमॅटोग्राफ प्रमाणीकरण नियम 2024 आणि संबंधित मार्गदर्शक तत्त्वांनुसार सार्वजनिक प्रदर्शनासाठी चित्रपट प्रमाणित करते.
प्रदर्शनास सज्ज चित्रपटातील सामग्री, जर भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेशी संबंधित, संरक्षण, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता, नैतिकता, बदनामी, न्यायालयाचा अवमान किंवा गुन्ह्याला प्रवृत्त करण्याशी संबंधित वैधानिक निकषांचे उल्लंघन करत असेल तरच त्यात कपात किंवा सुधारणा करण्याची शिफारस केली जाते.
गेल्या पाच वर्षांत (2020–21 ते 2024–25 ), सीबीएफसीने एकूण 71,963 चित्रपट प्रमाणित केले आहेत.
सिनेमॅटोग्राफ कायद्यात मंडळाच्या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील करण्याची तरतूद आहे. अशी प्रकरणे न्यायालयीन कार्यवाहीच्या पध्दतीनुसार हाताळली जातात.
सरकार पारदर्शक आणि जबाबदार प्रमाणन प्रक्रिया राबविण्यासाठी वचनबद्ध आहे, त्याचबरोबर सर्जनशील स्वातंत्र्याचे रक्षणही केले जाते आणि सिनेमॅटोग्राफ कायद्याअंतर्गत आपली जबाबदारी पार पाडते.
खासदार मनीष तिवारी आणि टी. आर. बल्लू यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर माहिती आणि प्रसारण आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी लोकसभेत हे उत्तर दिले आहे.
सुवर्णा बेडेकर /संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2223349)
अभ्यागत कक्ष : 14