रेल्वे मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील पालघर इथल्या डोंगरातून जाणाऱ्या दुसऱ्या बोगद्याचा यशस्वी ब्रेकथ्रू


MT-6 या डोंगर बोगदा 454 मीटर लांब 14.4 मीटर रुंद

पालघर मध्ये सुमारे एका महिन्यात दोन पर्वतीय बोगद्यांचा ब्रेकथ्रू साध्य

Posted On: 03 FEB 2026 7:27PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2026

बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्रातील पालघर इथल्या डोंगरातून जाणाऱ्या दुसऱ्या MT- 6 या बोगद्याचा यशस्वी ब्रेकथ्रू (बोगद्याचे दोन्ही टोकांकडचे खोदकाम पूर्ण होऊन आरपार बोगदा तयार होणे) झाल्याची घोषणा केंद्रीय रेल्वेमाहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. हा बोगदा 454 मीटर लांब आणि 14.4 मीटर रुंद असूनया बोगद्यातून  मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अप आणि डाऊन अशा दोन्ही रेल्वे मार्गिका जाणार आहेत.

बुलेट ट्रेन प्रकल्पाअंतर्गत पालघर जिल्ह्यात केवळ एका महिन्याच्या कालावधीत यशस्वीपणे ब्रेकथ्रू झालेला हा डोंगरातून जाणारा दुसरा बोगदा ठरला आहे. याआधी जानेवारी 2026 रोजी सफाळे जवळच्या MT-5 या डोंगर बोगद्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले होते.

आता यशस्वी ब्रेकथ्रू झालेला MT- 6 या डोंगर बोगद्याचे खोदकामबोगद्याच्या दोन्ही बाजुंनी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (NATM) या प्रगत ड्रिल-अँड-कंट्रोल्ड ब्लास्ट (छिद्र पाडून नियंत्रित स्फोट करणे) पद्धतीचा वापर करून करण्यात आले. या बोगद्याचे खोदकाम 12 महिन्यांच्या आत पूर्ण झाले आहे. डोंगर बोगद्याचा ब्रेकथ्रू हा अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातोयाअंतर्गत बोगद्याच्या दोन्ही विरुद्ध टोकांकडून खोदकाम करणारे चमू शेवटी मध्यभागी एकत्र येतात आणि डोंगरातून आरपार जाणारा एक सलग मार्ग तयार होतो.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या उल्लेखनीय प्रगतीबद्दल हाय स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले. हे पथक ज्या वेगाने काम करत आहेत्यामुळे देशात एक नवीन आत्मविश्वास निर्माण झाला असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. बांधकाम आणि तंत्रज्ञानातील अनेक नवनवीन प्रयोगांमुळे हा प्रकल्प जगाचे  लक्ष वेधून घेत असून त्याचे कौतुकही होत आहे. या प्रकल्पासाठी वापरली जाणारी अनेक प्रगत बांधकाम तंत्रज्ञान आणि मोठी यंत्रे भारतातच तयार केली गेली आहेतअसेही त्यांनी अधोरेखित केले.

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या गुजरात विभागाचे व्यावसायिक कामकाज पुढच्या वर्षी सुरू होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. हाय स्पीड रेल्वे सेवा 2028 पर्यंत ठाण्यापर्यंत विस्तारेल,  आणि 2029 पर्यंत संपूर्ण कॉरिडॉर मुंबईपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा हे देखील उपस्थित होते. पालघरमधील डोंगर बोगद्याच्या या यशाबद्दल त्यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरसमर्पित मालवाहतूक कॉरिडॉर आणि येऊ घातलेले वाढवण बंदर यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांच्या माध्यमातून पालघर जिल्ह्याचा वेगाने विकास होत असल्याचे त्यांनी नमूद केले. 2014 पासून महाराष्ट्रातील रेल्वे गुंतवणुकीत लक्षणीय वाढ झाली असूनपरिणामी प्रकल्प वेगाने पूर्ण होत आहेत आणि प्रवासी सेवांमध्येही सुधारणा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

पालघर जिल्ह्यासारखी जटिल भौगोलिक परिस्थिती आणि बोगद्यांचे अनियमित आकार यामुळे  बोगदे खोदणारी मोठी यंत्रे फारशी सोयीची नसतातअशा ठिकाणी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड ही पद्धत अधिक लवचिक ठरतेत्यामुळेच ती प्राधान्याने वापरली जाते. या प्रक्रियेसाठी खूप जड यंत्रसामग्रीची आवश्यकता नसते. या पद्धतीत शॉटक्रिटींग (काँक्रीटचा फवारा)रॉक बोल्ट्स (खडक मजबूत करणारे बोल्ट) आणि लॅटिस गर्डर्स (पोलादी सांगाडा) वापरून वास्तव वेळेच्या परिस्थितीनुसार बदल करणे शक्य असते.

बोगद्याच्या आत काम करणाऱ्या कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी विविध भू तांत्रिक उपकरणांचा वापरकामावर वास्तव वेळेत देखरेखकार्यक्षम अग्निसुरक्षा उपाययोग्य वायुवीजन आणि नियंत्रित प्रवेश व्यवस्था अशा उपाययोजना अमलात आणल्या होत्या.

महाराष्ट्रात अनेक आघाड्यांवर या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत वैतरणा नदीवरील सर्वात लांब रेल्वे पुलाचे काम खांब उभारण्याच्या स्तरापर्यंत पोहोचले आहेउल्हास आणि जगनी अशा इतर प्रमुख नद्यांवरील पाया उभारणीचे कामही प्रगतीपथावर आहे. वांद्रे कुर्ला संकुल आणि शिळफाटा दरम्यानचा 21 किमी लांबीचा बोगदातसेच राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग ओलांडण्यासाठीचे लांब पोलादी पूल उभारणीचे काम,तसेच  सर्व चार स्थानकांवर काम  वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एकूण डोंगर बोगद्यांचे काम सध्या सुरू आहे.

पालघर जिल्ह्यातील डोंगर बोगद्यांची सद्यस्थिती:

अ. क्र.

डोंगर बोगदा क्रमांक

लांबी (किमी)

कामाची टक्केवारी

शेरा

1

MT-1

0.820

16%

 

2

MT-2

0.228

-

पूर्वतयारीचे काम सुरू

3

MT-3

1.403

41%

 

4

MT-4

1.260

32%

 

5

MT-5

1.480

57%

02 जानेवारी 2026 रोजी ब्रेकथ्रू साध्य

6

MT-6

0.454

47%

आज ब्रेकथ्रू साध्य

7

MT-7

0.417

29%

 


मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल्वे प्रकल्प अंदाजे 508 किलोमीटर लांबीचा असूनयाअंतर्गत गुजरात आणि दादरा नगर हवेलीमधील 352 किमी आणि महाराष्ट्रातील 156 किमी क्षेत्राचा समावेश आहे. या प्रकल्पामुळे या मार्गावरील आर्थिक घडामोडींना चालना मिळेलज्ञानाची देवाणघेवाण सुलभ होईल आणि नवीन औद्योगिक तसेच माहिती तंत्रज्ञान केंद्र विकासित करण्याला पाठबळ मिळेल अशी अपेक्षा आहे. हा कॉरिडॉर साबरमतीअहमदाबादआणंदवडोदराभरूचसुरतबिलिमोरावापीबोईसरविरारठाणे आणि मुंबई या प्रमुख शहरांना जोडणार असूनभारताच्या वाहतूक पायाभूत सुविधांमधील हे एक परिवर्तनकारी पाऊल ठरणार आहे.

27 जानेवारी 2026 पर्यंतच्या माहितीनुसारसुमारे 334 किमी लांबीचे व्हायडक्ट्स (उंच पूल)नदीवरील 17 पूल आणि राष्ट्रीय महामार्ग तसेच रेल्वे मार्गावरील 12 प्रमुख क्रॉसिंगचे काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या गुजरात विभागात रेल्वे मार्गिका टाकण्याच्या  आणि विद्युतीकरणाच्या कामांनी आता वेग घेतला आहे.

 

निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2222773) अभ्यागत कक्ष : 43