माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 साठी वेव्हएक्सने स्टार्टअप क्षेत्राकडून अर्ज मागवले


इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 माध्यम, मनोरंजन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपायांवर प्रकाश टाकणार

वेव्हएक्स च्या माध्यमातून एआय स्टार्टअप्सना व्यवसाय नेटवर्किंग आणि प्रदर्शनासाठी व्यासपीठ मिळणार

प्रविष्टि तिथि: 30 JAN 2026 10:18PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जानेवारी 2026

 

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 16 ते 20 फेब्रुवारी 2026 दरम्यान नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित केलेल्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी वेव्हएक्सने स्टार्टअप्सकडून अर्ज मागवले आहेत. ही शिखर परिषद भारतातील वेगाने विकसित होत असलेल्या एआय परिसंस्थेत नाविन्यपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) उपायांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि सहकार्याला चालना देणारे एक प्रमुख राष्ट्रीय व्यासपीठ म्हणून काम करेल.

शिखर परिषदेचा एक भाग म्हणून, वेव्हएक्स, एक समर्पित स्टार्टअप प्रदर्शन कार्यक्रम आयोजित करेल, या माध्यमातून निवडक स्टार्टअप्सना त्यांची कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उत्पादने आणि उपाय विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर प्रदर्शित करता येतील. एव्हीजीसी-एक्सआर विभागात कार्यरत असलेल्या आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उत्पादनांवर काम करणाऱ्या स्टार्टअप्सना, एआय इम्पॅक्ट समिट दरम्यान एमआयबी पॅव्हेलियनमध्ये समर्पित प्रदर्शन आणि व्यवसाय नेटवर्किंगच्या संधी उपलब्ध केल्या जातील.

एमआयबी पॅव्हेलियन, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील अत्याधुनिक आणि उदयोन्मुख एआय तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्यासाठी एक मध्यवर्ती केंद्र म्हणून काम करेल, ज्यामुळे नवोन्मेषकांना धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील धुरीण, गुंतवणूकदार आणि जागतिक भागधारकांशी संवाद साधता येईल, आणि यामुळे सर्जनशील आणि तंत्रज्ञान परिसंस्थेमध्ये सहकार्य वाढेल.

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026, स्टार्टअप्स आणि प्रमुख भागधारकांमध्ये संरचित सहयोग वाढवून, भारताची एआय नवोन्मेष परिसंस्था मजबूत करण्यात महत्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.

 

वेव्हएक्स (WaveX)

वेव्हएक्स हा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्हज् (WAVES), या उपक्रमांतर्गत स्टार्टअप्स ना प्रोत्साहन देणारे समर्पित व्यासपीठ असून, ते माध्यमे, मनोरंजन आणि भाषा तंत्रज्ञान परिसंस्थेमध्ये नवोन्मेष वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो. भारतातील पुढील पिढीच्या सर्जनशील आणि तंत्रज्ञान-चालित स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी सुरू केलेले वेव्हएक्स, हे नवोन्मेषक, सरकारी संस्था आणि उद्योग क्षेत्रातील धुरीण यांना जोडणारा दुवा, म्हणून काम करते. वेव्हएक्स उद्दिष्ट केंद्रित हॅकाथॉन, संरचित इनक्युबेशन प्रोग्राम, मार्गदर्शन आणि राष्ट्रीय प्लॅटफॉर्मबरोबर सहयोग, याद्वारे यशस्वी कल्पनांना समर्थन देत आहे. एक मजबूत आणि अखंड इनक्युबेशन परिसंस्था निर्माण करण्यासाठी, वेव्हएक्सने टी-हब हैदराबाद आणि आयआयटी दिल्ली बरोबर  भागीदारी केली असून, ते आयआयसीटी मुंबई, एफटीआयआय पुणे, एसआरएफटीआय कोलकाता, आयआयएमसी दिल्ली, आयआयएमसी आयझॉल, आयआयएमसी अमरावती, आयआयएमसी ढेंकनाल, आयआयएमसी कोट्टायम आणि आयआयएमसी जम्मू, या भारतातील नऊ इनक्युबेशन केंद्रांमध्ये कार्यरत आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या: https://wavex.wavesbazaar.com/

 

* * *

शैलेश पाटील/राजश्री आगाशे/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2221101) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Kannada