पंतप्रधान कार्यालय
पश्चिम बंगालमधील आनंदपूर येथे लागलेल्या आगीतील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत जाहीर
प्रविष्टि तिथि:
30 JAN 2026 7:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील आनंदपूर येथे लागलेल्या आगीतील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:
"पश्चिम बंगालमधील आनंदपूर येथील आगीची दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रति सहवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी मी प्रार्थना करतो.
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकाला 2 लाख रुपयांची मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये दिले जातील: पीएम @narendramodi"
"পশ্চিমবঙ্গের আনন্দপুরে সাম্প্রতিক অগ্নিকাণ্ড অত্যন্ত মর্মান্তিক ও দু:খজনক। যাঁরা তাঁদের প্রিয়জনকে হারিয়েছেন তাঁদের প্রতি আমার সমবেদনা রইল। আহতদের দ্রুত আরোগ্য কামনা করি।
এই দুর্ঘটনায় নিহত প্রত্যেকের নিকটাত্মীয়কে PMNRF থেকে ২ লক্ষ টাকা করে এককালীন সহায়তা দেওয়া হবে। আহতদের ৫০,০০০ টাকা সহায়তা প্রদান করা হবে: প্রধানমন্ত্রী @narendramodi"
* * *
सोनाली काकडे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2221020)
आगंतुक पटल : 6