नागरी उड्डाण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे लियरजेट 45 विमान व्हीटी-एस एस के बारामती विमानतळावर कोसळले

प्रविष्टि तिथि: 28 JAN 2026 5:36PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 जानेवारी 2026

 

28.01.2026 रोजी मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्हीटी-एस एस के नोंदणी क्रमांकाच्या लियरजेट 45 विमानाचा "मुंबई-बारामती" या मार्गावर प्रवास करत असताना बारामती येथे हवाई अपघात झाला. विमानात चालक दलाच्या दोन सदस्यांसह एकूण पाच व्यक्ती होत्या. प्रवाशांमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश होता. विमानातील सर्व व्यक्तींना प्राणघातक दुखापती झाल्या.

संस्थेची माहिती:

  • मेसर्स व्हीएसआर व्हेंचर्स ही एक नॉन-शेड्यूल्ड ऑपरेटर (एन एस ओपी) कंपनी आहे, परवाना क्रमांक 07/2014.
  • प्रारंभिक एओपी 21.04.2014 रोजी जारी करण्यात आला होता.
  • एओपीचे शेवटी 03.04.2023 रोजी नूतनीकरण करण्यात आले आणि तो 20.04.2028 पर्यंत वैध आहे.
  • ताफ्यातील विमानांची संख्या: सतरा (17) विमाने.

या ताफ्यात सात (07) लियरजेट 45 विमाने (त्यापैकी एक अपघातग्रस्त), पाच एम्ब्रेअर 135बीजे विमाने, चार किंग एअर बी200 विमाने आणि एक पिलाटस पीसी-12विमान यांचा समावेश होता.

  • डीजीसीएद्वारे शेवटचे नियामक लेखापरीक्षण फेब्रुवारी 2025 मध्ये करण्यात आले होते आणि त्यात स्तर-1 वरील कोणताही दोष आढळला नाही.
  • 14.09.2023 रोजी कंपनीच्या विमानांपैकी एक, व्हीटी-डीबीएल या नावाने नोंदणी असलेले लियरजेट 45 विमान मुंबई विमानतळावर उतरताना अपघातग्रस्त झाले. या अपघाताचा तपास एएआयबीद्वारे सुरू आहे.

26.01.2026 रोजीची विमानाची माहिती:

  • विमानाचा नोंदणी क्रमांक: व्हीटी-एस एस के
  • उत्पादन वर्ष: 2010
  • नोंदणी प्रमाणपत्र जारी केल्याची तारीख: 27/12/2022
  • हवाई योग्यता प्रमाणपत्र जारी केल्याची तारीख: 16/12/2021
  • हवाई योग्यता पुनरावलोकन प्रमाणपत्र जारी केल्याची तारीख: 10/09/2025, 14/09/2026 पर्यंत वैध
  • नवीन (TSN) पासूनचा वेळ / नवीन ( CSN) पासून ची सायकल्स : 4915:48 / 5867
  • शेवटच्या हवाईयोग्यता पुनरावलोकनापासूनचा वेळ : 85:49तास

इंजिन तपशील

  • इंजिन प्रकार: टीएफई731-20बीआर         
  • डाव्या बाजूच्या इंजिनचे तास/सायकल्स:4915:48/ 5965
  • उजव्या बाजूच्या इंजिनचे तास/सायकल्स: 4526:44/ 5426

कर्मचारी माहिती

पायलट इन कमांड: एटीपीएल धारक

  • उड्डाणाचे तास: 15,000 तासांपेक्षा जास्त
  • शेवटच्या वैद्यकीय तपासणीची तारीख: 19.11.2025, 19.05.2026 पर्यंत वैध
  • शेवटच्या आयआर/पीपीसीची तारीख: 18.08.2025

सह-वैमानिक: सीपीएल धारक

  • उड्डाणाचे तास: 1500 तास (अंदाजे)
  • शेवटच्या वैद्यकीय तपासणीची तारीख: 12.07.2025, 24.07.2026 पर्यंत वैध
  • शेवटच्या आयआर/पीपीसीची तारीख: 22.07.2025

विमान अपघाताला कारणीभूत ठरलेला घटनाक्रम:

बारामती हे एक अनियंत्रित विमानतळ (Uncontrolled Airfield) असून, तिथल्या हवाई वाहतुकीची माहिती बारामतीमधील उड्डाण प्रशिक्षण संस्थांच्या प्रशिक्षकांकडून किंवा वैमानिकांकडून दिली जाते. हवाई वाहतूक नियंत्रण (ATC - Air Traffic Control) कक्षात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या जबाबानुसार अपघाताचा घटनाक्रम खाली नमूद केल्याप्रमाणे आहे:

  • 28 जानेवारी 2026 रोजी VI-SSK या विमानाचा बारामती केंद्राशी पहिला संपर्क सकाळी 08:18 वाजता झाला. विमानाचा पुढचा संपर्क बारामतीपासून 30 नॉटिकल मैल (NM - Nautical Miles) अंतरावर असताना झाला आणि त्यांना पुणे केंद्राकडून परवानगी देण्यात आली. वैमानिकांना त्यांच्या विवेकानुसार दृश्य हवामान परिस्थितीत (Visual Meteorological Conditions) विमान खाली उतरवण्याचा सल्ला देण्यात आला होता.
  • विमानातील कर्मचाऱ्यांनी वारे आणि दृश्यमानतेबाबत (Visibility) चौकशी केली असता, वारे शांत असून दृश्यमानता सुमारे 3000 मीटर असल्याची माहिती त्यांना देण्यात आली.
  • त्यानंतर विमान धावपट्टी क्रमांक 11 च्या फायनल अप्रोचवर असल्याचे कळवले गेले, मात्र त्यांना धावपट्टी दिसत नव्हती. त्यामुळे पहिल्या प्रयत्नात त्यांनी गो अराउंड (पुन्हा उड्डाण करून वळण घेणे) करण्याचा निर्णय घेतला.
  • गो अराउंड केल्यानंतर विमानाला त्याच्या स्थानाबद्दल विचारले असता, कर्मचाऱ्यांनी धावपट्टी क्रमांक 11 च्या फायनल अप्रोचवर असल्याचे सांगितले.
  • त्यांना धावपट्टी दिसताच कळवण्यास सांगण्यात आले. त्यावर, धावपट्टी सध्या दिसत नाही, दिसल्यानंतर कळवू, असे उत्तर त्यांनी दिले. काही सेकंदांनंतर त्यांनी धावपट्टी दिसत असल्याचे कळवले.
  • भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 08:43 वाजता विमानाला धावपट्टी क्रमांक 11 वर उतरण्यासाठी परवानगी (Clearance) देण्यात आली, मात्र विमानातील कर्मचाऱ्यांनी या परवानगीला प्रतिसाद (Readback) दिला नाही.
  • त्यानंतर भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 08:44 वाजता धावपट्टी क्रमांक 11 च्या सुरुवातीच्या भागाजवळ (Threshold) हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला आगीच्या ज्वाळा दिसल्या. तात्काळ आपत्कालीन सेवा घटनास्थळी रवाना झाल्या.
  • विमानाचे अवशेष धावपट्टी क्रमांक 11 च्या सुरुवातीच्या भागाच्या डाव्या बाजूला सापडले आहेत.
  • विमान अपघात तपास विभागाने (AAIB - Aircraft Accident Investigation Bureau) या तपासाची सूत्रे हाती घेतली असून, या विभागाचे महासंचालक तपासासाठी अपघातस्थळी पोहोचत आहेत. या प्रकरणाचे अधिक तपशील उपलब्ध होताच सामायिक केले जातील.

 

* * *

शैलेश पाटील/नंदिनी मथुरे/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2219683) आगंतुक पटल : 135
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Telugu , Kannada , Malayalam