पंतप्रधान कार्यालय
प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधानांकडून सर्व देशवासियांना शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
26 JAN 2026 11:22AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
भारताचा मान, अभिमान आणि प्रतिष्ठा असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या या राष्ट्रीय महाउत्सवामुळे सर्व नागरिकांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि नवचैतन्याचा संचार होवो, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
या राष्ट्रीय प्रसंगी 'विकसित भारत' घडवण्याचा सामूहिक संकल्प अधिक सुदृढ व्हावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधानांनी 'X' या समाज माध्यमावर म्हटले आहे:
“सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. भारताचा मान, अभिमान आणि प्रतिष्ठा असलेल्या या राष्ट्रीय महाउत्सवामुळे आपल्या सर्वांच्या जीवनात नवी ऊर्जा आणि नव्या उत्साहाचा संचार व्हावा. 'विकसित भारता'चा संकल्प अधिक सुदृढ होवो, हीच सदिच्छा!”
“प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
विकसित भारत घडवण्याच्या आपल्या सामूहिक संकल्पात या निमित्त नव्याने ऊर्जा आणि उत्साह निर्माण होवो.”
* * *
यश राणे / आशुतोष सावे / दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2218731)
आगंतुक पटल : 10