पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान म्हणाले की, हा दिवस देशातील लोकशाही मूल्यांवरील विश्वास अधिक दृढ करण्याची संधी आहे. भारताच्या लोकशाही प्रक्रियांना बळकटी देण्यासाठी समर्पितपणे काम करणाऱ्या भारत निवडणूक आयोगाशी संबंधित सर्वांचे त्यांनी यानिमित्त कौतुक केले.
मतदार सहभागाचे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, मतदार असणे हा केवळ एक घटनात्मक हक्क नाही, तर भारताच्या भवितव्याला आकार देण्यासाठी प्रत्येक नागरिकाला आपला आवाज देणारे एक अत्यंत महत्त्वाचे कर्तव्य आहे. लोकांनी नेहमी लोकशाही प्रक्रियांमध्ये सहभागी व्हावे आणि लोकशाहीच्या भावनेचा सन्मान करावा असे आवाहन करताना ते म्हणाले की, यामुळे विकसित भारताच्या पायाभरणीला बळकटी मिळेल.
श्री मोदी यांनी मतदार होणे हा उत्सवाचा क्षण असल्याचे सांगत प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पंतप्रधानांनी एमवाय-भारत स्वयंसेवकांना एक पत्र लिहिल्याचे सांगितले असून, आपल्या आजूबाजूला कोणी, विशेषतः एखादा तरुण, प्रथमच मतदार म्हणून नोंदणी करतो तेव्हा आनंद साजरा करण्याचे आणि उत्सव करण्याचे आवाहन त्यांनी त्यांना केले आहे.
सामाजिक माध्यम एक्स वरील संदेशांच्या मालिकेत श्री मोदी म्हणाले;
“#नॅशनल व्होटर्स डे -NationalVotersDay निमित्त शुभेच्छा.
हा दिवस आपल्या देशातील लोकशाही मूल्यांवरील विश्वास अधिक दृढ करण्याबाबत आहे.
आपल्या लोकशाही प्रक्रियांना बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भारत निवडणूक आयोगाशी संबंधित सर्वांचे मी अभिनंदन करतो.
मतदार असणे हा केवळ घटनात्मक हक्क नाही, तर भारताच्या भवितव्याला आकार देण्यासाठी प्रत्येक नागरिकाला आवाज देणारे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. लोकशाही प्रक्रियांमध्ये नेहमी सहभागी होऊन आपण आपल्या लोकशाहीच्या भावनेचा सन्मान करूया आणि त्याद्वारे विकसित भारताच्या पायाभरणीला बळकटी देऊया.”
“मतदार होणे हा उत्सवाचा क्षण आहे!
आज, #नॅशनल व्होटर्स डे- NationalVotersDay निमित्त, आपल्या आजूबाजूला कोणी मतदार म्हणून नोंदणी केल्यावर आपण सर्वांनी कसा आनंद साजरा करावा याबाबत एमवाय-भारत स्वयंसेवकांना एक पत्र लिहिले आहे.”
****
अंबादास यादव/नितीन गायकवाड/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2218399)