पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी रोजगार मेळ्यांतर्गत नियुक्ती पत्रे वितरित करण्याप्रसंगी केलेल्या भाषणातील काही भाग केला सामायिक  

प्रविष्टि तिथि: 24 JAN 2026 7:01PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार मेळ्यांतर्गत नियुक्ती पत्रे वितरित करण्याप्रसंगी केलेल्या भाषणातील काही भाग सामायिक केला आहे.

एक्स वरील आपल्या संदेशांच्या  मालिकेत  पंतप्रधानांनी लिहिले ,

 “युवाशक्तीसाठी देशात - जगभरात नवीन संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आमचे प्रयत्न नेहमीच चालू असतात. आज ऍनिमेशन व डिजिटल माध्यमे यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये भारत जागतिक केंद्र बनत चालला आहे, आणि त्यात आमच्या तरुण मित्रांना नेहमीच नव्या संधी मिळत आहेत.”

“उत्पादन , इलेक्ट्रॉनिक्स , ऑटो व फार्मा अशा अनेक क्षेत्रांमध्ये शक्तिकेंद्र बनल्यामुळे आज जगाचा भारतावरील भरवसा वाढला आहे. यामुळेदेखील तरुणांसाठी अधिक नव्या संधी उपलब्ध होत आहेत.”

 “आज देशात सुरु झालेल्या रिफॉर्म एक्सप्रेस मुळे श्रमिक व कर्मचाऱ्यांसह प्रत्येकाला मोठा फायदा होत आहे. याची गती तशीच सुरु ठेवण्यासाठी माझ्याकडून तुम्हाला एक विशेष विनंती…..”

***

शैलेश पाटील/उमा रायकर/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2218353) आगंतुक पटल : 6
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu , Kannada , Malayalam