पंतप्रधान कार्यालय
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली अर्पण
प्रविष्टि तिथि:
12 JAN 2026 10:13AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधानांनी सांगितले की, स्वामी विवेकानंद यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य विकसित भारत निर्मितीच्या संकल्पात सातत्याने नवी ऊर्जा देत राहते. “राष्ट्रीय युवा दिनाच्या या पवित्र प्रसंगी सर्व देशवासीयांना, विशेषतः आपल्या युवा सहकाऱ्यांना नवी ताकद आणि नवा आत्मविश्वास प्राप्त व्हावा,” अशी सदिच्छा मोदी यांनी व्यक्त केली.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स वरील संदेशात म्हटले आहे,
"भारतीय युवाशक्तीचे सशक्त प्रेरणास्रोत स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या जयंतीनिमित्त माझी आदरपूर्वक श्रद्धांजली. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व विकसित भारताच्या संकल्पाला सातत्याने नवी ऊर्जा देणारे आहे. राष्ट्रीय युवा दिनाचा हा दिव्य प्रसंग सर्व देशवासियांसाठी, विशेषतः आपल्या युवा सहकाऱ्यांसाठी नवी शक्ती आणि नवा आत्मविश्वास घेऊन येवो, ही माझी कामना आहे."
***
NehaKulkarni/ReshamaJathar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2213614)
आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam