पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी प्रवासी भारतीय दिवसानिमित्त जागतिक स्तरावरील भारतीय समुदायाला दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
09 JAN 2026 2:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक भारतीय समुदायाला प्रवासी भारतीय दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतीय समुदाय हा कायमच भारत आणि संपूर्ण विश्व यांच्यातील प्रभावशाली सेतू म्हणून कार्य करत आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख पंतप्रधानांनी केला आहे.
या समुदायाला भारताच्या अधिक निकट आणण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाय करत आहे, असे ते म्हणाले.
‘एक्स’वरील पोस्ट मध्ये पंतप्रधानांनी लिहिले आहे:
"प्रवासी भारतीय दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.भारतीय समुदाय भारत आणि जगादरम्यान एक शक्तिशाली दुवा म्हणून कायम आहे. जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्यांनी समाज समृद्ध केला आहे आणि त्याच वेळी आपल्या मूलधारांशी देखील ते जोडलेले आहेत. मी नेहमी असे म्हणत असतो की आपला भारतीय समुदाय हे आपले राष्ट्रदूत आहेत, ज्यांनी भारताला जागतिक स्तरावर लोकप्रिय केले आहे. आपल्या समुदायाला भारताच्या अधिक निकट आणण्यासाठी आपल्या सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत."
नितीन फुल्लुके /भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212810)
आगंतुक पटल : 16
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam