WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्हज् बाजारकडून सर्जनशील व्यावसायिकांसाठी वार्षिक क्षमता-वृद्धी वेबिनार कार्यक्रमाचा प्रारंभ


वर्षभर चालणारे उद्योग वेबिनार : भारतातील सर्जनशील व्यावसायिकांसाठी ज्ञानवृद्धी आणि जागतिक बाजार सज्जतेसाठी ठरणार उपयुक्त

 प्रविष्टि तिथि: 08 JAN 2026 8:40PM |   Location: PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 जानेवारी 2026

यशस्वी प्रारंभ झाल्याच्या पार्श्वभूमीवर वेव्हज् बाजार आता वर्षभर चालणारे सक्रिय सहभाग केंद्र म्हणून कार्यरत होत असून, उद्योग तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली संरचित वेबिनार आणि मास्टरक्लास सत्रांची मालिका सुरू करत आहे. या मोहिमेचा उद्देश भारतातील चित्रपट, संगीत, ऍनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रातील व्यावसायिक क्षमता बळकट करणे हा आहे.

नवीन शैक्षणिक कार्यक्रम

या आगामी कार्यक्रमात सर्जनशील व्यक्ती, स्टुडिओ आणि स्टार्टअप्स यांना उद्योगातील प्रस्थापित तज्ज्ञांशी थेट जोडले जाईल. सत्रांमध्ये पुढील प्रमुख विषयांवर भर दिला जाईल:

· व्यावहारिक सामग्री निर्मिती: उत्पादन आणि सर्जनशील कार्यप्रवाहावरील अनुभवाधारित माहिती
· मुद्रीकरण आणि बौद्धिक संपदा: बौद्धिक संपदा आणि महसूल निर्मितीची धोरणे
· जागतिक पोहोच: आंतरराष्ट्रीय प्रसारासाठी बाजार सज्जता आणि डिजिटल माध्यम पर्यावरण

ही सत्रे संवादात्मक ऑनलाइन स्वरूपात असतील, ज्यामध्ये स्वतंत्र व्यावसायिक आणि उद्योजकांना प्रश्नोत्तराच्या माध्यमातून तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळेल. त्यामुळे वास्तविक ज्ञानविनिमय सुलभ होईल.

वेव्हज् बाजार हे वर्षभर चालणारे सक्रिय सहभाग व्यासपीठ म्हणून विकसित करण्यासाठी, चित्रपट, संगीत, अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रातील व्यावसायिक क्षमता वृद्धीवर केंद्रित, उद्योग तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली संरचित वेबिनार आणि मास्टरक्लास सत्रांची मालिका वर्षभर आयोजित करेल. या सत्रांचा उद्देश ज्ञानविनिमय, जागतिक बाजार सज्जता आणि क्षेत्रनिहाय अंतर्दृष्टी थेट तज्ज्ञ संवादाच्या माध्यमातून प्रदान करणे हा आहे.

हा वेबिनार कार्यक्रम वेव्हज् बाजारच्या सर्जनशील उद्योजकता, जागतिक सहकार्य आणि माध्यम पर्यावरण विकास या व्यापक उद्दिष्टांचा भाग आहे.

सहभागींना क्षेत्र-सुसंगत माहिती उपलब्ध करून देत, ही मोहीम सर्जनशील आणि डिजिटल माध्यम पर्यावरणात माहितीपूर्ण निर्णयप्रक्रियेस सहाय्य करते. तसेच, चित्रपट, संगीत आणि गेमिंग क्षेत्रात सातत्यपूर्ण, संरचित संवाद व सहभाग सुलभ करत, सहकार्य, क्षमता-वृद्धी आणि दीर्घकालीन माध्यम पर्यावरण विकासास चालना देते.

ही सत्रे यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर सर्व सहभागी व्यावसायिकांना वेव्हज् बाजार कडून सहभाग प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.

 

वेबिनार वेळापत्रक

जानेवारी 2026 मध्ये वेव्हज् बाजार, उद्योग तज्ज्ञांच्या नेतृत्वाखाली, जागतिक बाजार प्रवेश आणि सर्जनशील क्षेत्रातील बौद्धिक संपदा या विषयांवर आधारित दोन निश्चित वेबिनार सत्रे आयोजित करेल.

15 जानेवारी रोजी अकादमी पुरस्कार विजेत्या निर्मात्या गुनीत मोंगा या चित्रपट-केंद्रित वेबिनारचे नेतृत्व करतील.

सत्र शीर्षक टेकिंग इंडिया टू द इंटरनॅशनल मार्केट असेच ठेवले आहे.

या सत्राचा भर भारतातील चित्रपट व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय बाजार प्रवेशाच्या दृष्टीने मार्गदर्शन देण्यावर असेल.

22 जानेवारी रोजी त्यानंतर डिजिटल संगीत क्षेत्रातील बौद्धिक संपदा हक्कांच्या संरक्षणावर आधारित संगीत क्षेत्राशी संबंधित वेबिनार आयोजित करण्यात येणार आहे. हा वेबिनार हूपर या एआय-आधारित संगीत परवाना मंचाचे संस्थापक गौरव दगावकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.

फेब्रुवारी 2026 मध्ये वेव्हज् बाजार अंतर्गत चित्रपट, गेमिंग, अॅगनिमेशन आणि प्लॅटफॉर्म सक्षमतेशी संबंधित विविध विषयांवर ऑनलाईन सत्रांची मालिका आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांत पटकथा निर्मीती आणि कथाकथन, जागतिक गेम निर्मात्यांच्या अपेक्षा, भारतीय पौराणिक कथांचे जागतिक प्रेक्षकांसाठी सादरीकरण, ऍनिमेशनमधील डिझाइनचा व्यावसायिक पैलू, तसेच वेव्हज् बाजार पोर्टल आणि व्ह्यूइंग रूम्सचा वापर कसा करावा, याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मार्च 2026 मधील कार्यक्रमाचे वेळापत्रक महत्त्वाच्या बाजारपेठीय आणि विकासविषयक विषयांवर केंद्रित असणार आहे. या सत्रांमध्ये भारतीय गेमिंग परिसंस्थेतील उत्पन्ननिर्मिती, गुंतवणुकीच्या कठीण परिस्थितीत निधी मिळवण्यातील आव्हाने, यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर संगीत रॉयल्टी आणि डिजिटल वितरण, तसेच भारतामध्ये पीसी गेमिंगचे पुनरुज्जीवन यांसारख्या मुद्द्यांचा ऊहापोह केला जाणार आहे.

ही सत्रे वर्षभर चालणाऱ्या व्यापक ज्ञान कार्यक्रमाचा भाग असून, चित्रपट, संगीत, गेमिंग आणि उदयोन्मुख माध्यमांमध्ये बाजारपेठेतील प्रवेश, उत्पन्ननिर्मिती, तंत्रज्ञान आणि जागतिक सहकार्य यांवर अधिक वेबिनार आयोजित करण्यात येणार आहेत.

27 जानेवारी 2025 रोजी राष्ट्रीय माध्यम केंद्रात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेला वेव्हज् बाजार हा माध्यमे आणि मनोरंजन क्षेत्रासाठीचा अग्रगण्य जागतिक बाजारपेठ मंच आहे.

हा मंच दूरदर्शन, गेमिंग, जाहिरात, एक्सआर तसेच संबंधित क्षेत्रांतील भागधारकांसाठी एक केंद्र म्हणून कार्य करतो. स्थापनेपासून आतापर्यंत या मंचाने महत्त्वाची टप्पे गाठले आहेत.

  • 5,000 पेक्षा अधिक नोंदणीकृत खरेदीदार आणि तितक्याच संख्येने विक्रेते.
  • विविध क्षेत्रांत 1,900 पेक्षा अधिक सक्रिय प्रकल्प.

शैलेश पाटील/गजेंद्र देवडा/राज दळेकर/प्रिती मालंडकर

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


रिलीज़ आईडी: 2212629   |   Visitor Counter: 13

इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Gujarati , Urdu , हिन्दी , Punjabi , Tamil , Telugu , Kannada , Malayalam