पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी विकसित भारताच्या उभारणीतील तरुणांच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारा लेख केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2026 3:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचा एक लेख सामायिक केला आहे, यात देशाच्या महत्त्वपूर्ण क्षणांना आकार देण्यातील भारताच्या तरुणांची चिरस्थायी भूमिका अधोरेखित करण्यात आली आहे.
भारताच्या तरुणांनी नेहमीच राष्ट्राच्या महत्त्वाच्या क्षणांना आकार दिल्याचे या लेखात अधोरेखित करण्यात आले आहे. विकसित भारत युवा नेते संवाद म्हणजे भारतीय तरुणांना पुढे येऊन नेतृत्व करण्यासाठी, राष्ट्रीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आणि आपल्या महत्त्वाकांक्षांना विकसित भारताच्या निर्मितीसाठी योग्य दिशा देण्यासाठी आवाहन करणारी चळवळ आहे, असे वर्णन या लेखात करण्यात आले आहे.
एक्सवर हा लेख सामायिक करताना पंतप्रधानांनी म्हटले आहे की;
“या विचारप्रवर्तक लेखात केंद्रीय मंत्री डॉ. @mansukhmandviya यांनी यावर जोर दिला आहे की, भारताच्या तरुणांनी नेहमीच राष्ट्राच्या महत्त्वाच्या क्षणांना आकार दिला आहे.”
मंत्र्यांनी 'विकसित भारत युवा नेते संवाद' याला एक चळवळ म्हणून संबोधले आहे, जी तरुण भारतीयांना पुढे येऊन नेतृत्व करण्यास, राष्ट्रीय आव्हानांना सामोरे जाण्यास तसेच त्यांच्या महत्त्वाकांक्षांना विकसित भारताच्या निर्मितीसाठी योग्य दिशा देण्यास आवाहन करते.
निलीमा चितळे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212417)
आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam