पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या प्रारंभाबद्दल राष्ट्राला शुभेच्छा दिल्या
सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांनी एक सुभाषित सामायिक केले
प्रविष्टि तिथि:
08 JAN 2026 2:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जानेवारी 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या प्रारंभाबद्दल राष्ट्राला शुभेच्छा दिल्या असून गेल्या हजारो वर्षांपासून लाखो लोकांच्या हृदयात सोमनाथ मंदिराला जिवंत ठेवणाऱ्या कालातीत सांस्कृतिक भावनेचे स्मरण केले आहे.
जानेवारी 1026 मध्ये सोमनाथ मंदिरावर पहिला हल्ला झाला. त्यानंतर आलेल्या अनेक शतकांमध्ये वारंवार हल्ले होऊनही भाविकांची अतूट श्रद्धा कायम राहिली आणि संस्कृतीच्या दृढ निश्चयाने सोमनाथ प्रत्येक वेळी नव्याने पुन्हा उभे राहिले. "सोमनाथ स्वाभिमान पर्व हे भारतमातेच्या त्या अगणित सुपुत्रांचे स्मरण आहे ज्यांनी कधीच आपली तत्त्वे आणि मूल्यांशी तडजोड केली नाही. काळ कितीही कठीण असला तरी त्यांचा निर्धार ठाम राहिला आणि आपल्या मूल्यांप्रति त्यांची निष्ठा अढळ राहिली.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी त्यांच्या यापूर्वीच्या सोमनाथ मंदिराच्या भेटीची क्षणचित्रे सामायिक केली असून नागरिकांनी #सोमनाथस्वाभिमानपर्व वापरुन आपल्या आठवणी सामायिक करुन या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत 1951 मध्ये मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या घटनेला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने 31 ऑक्टोबर 2001 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे त्यांनी स्मरण केले. या मंदिराच्या पुनर्निमितीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, केएम मुन्शी आणि इतर अनेकांनी केलेल्या प्रयत्नांचे योगदान अतिशय मोलाचे होते. सन 2001 मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 125 व्या जयंतीचा योग देखील जुळून आला होता आणि या कार्यक्रमाला पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
भविष्याचा वेध घेताना, पंतप्रधानांनी म्हटले आहे की 2026 हे वर्ष 1951 मध्ये झालेल्या भव्य सोहळ्याचे 75 वर्षपूर्तीचे वर्ष आहे, ज्यावेळी सोमनाथ मंदिर राष्ट्राला समर्पित करण्यात आले होते. "हा टप्पा केवळ मंदिराच्या पुनर्निर्मितीचा नव्हे तर संस्कृतीबद्दल असलेल्या दुर्दम्य भावनेचा असून तो येणाऱ्या कित्येक पिढयांना प्रेरणा देत राहील." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एक्स समाजमाध्यमावर लिहिलेल्या विविध पोस्ट्समध्ये त्यांनी म्हटले आहे :
“जय सोमनाथ!
सोमनाथ स्वाभिमान पर्व आजपासून सुरु होत आहे. हजारो वर्षांपूर्वी जानेवारी 1026, मध्ये सोमनाथवर पहिला हल्ला झाला होता. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये वारंवार झालेल्या हल्ल्यांमुळे भाविकांची अतूट श्रद्धा कमी झाली नाही आणि सांस्कृतिक चैतन्याला धक्का लागला नाही त्यामुळेच सोमनाथ प्रत्येक वेळी नव्याने पुन्हा उभे राहिले.
मी सोमनाथला दिलेल्या माझ्या पूर्वीच्या भेटींचे काही फोटो सामायिक करत आहे. तुम्हीही तिथे गेला असाल, तर ते #SomnathSwabhimanParv वापरून सामायिक करा.
"#SomnathSwabhimanParv हे भारतमातेच्या त्या अगणित सुपुत्रांचे स्मरण आहे ज्यांनी कधीच आपल्या तत्त्वांशी आणि मूल्यांशी तडजोड केली नाही. कितीही कठीण काळ आला तरी त्यांचा निर्धार ठाम राहिला आणि आपल्या मूल्यांप्रति असलेली त्यांची निष्ठा अढळ राहिली.”
"सोमनाथ येथे 31 ऑक्टोबर 2001 रोजी झालेल्या सोहळ्याची ही एक झलक. मंदिराच्या पुनर्निमितीनंतर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत सन 1951 मध्ये सोमनाथ मंदिर पुन्हा एकदा खुले करण्याच्या सोहळ्याला त्यावर्षी 50 वर्षे पूर्ण झाली होती. सरदार वल्लभभाई पटेल, केएम मुन्शी आणि इतर अनेकांनी केलेल्या प्रयत्नांचे योगदान अतिशय मोलाचे होते. त्याच वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांची 125 वी जयंती देखील होती. 2001 च्या कार्यक्रमाला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
2026 मध्ये आपण 1951 च्या समारंभाच्या अमृत महोत्सवाचा भव्य सोहळा साजरा करत आहोत !”
जय सोमनाथ !
सोमनाथ स्वाभिमान पर्व का आज से शुभारंभ हो रहा है। एक हजार वर्ष पूर्व, जनवरी 1026 में सोमनाथ मंदिर ने अपने इतिहास का पहला आक्रमण झेला था। साल 1026 का आक्रमण और उसके बाद हुए अनेक हमले भी हमारी शाश्वत आस्था को डिगा नहीं सके। बल्कि इनसे भारत की सांस्कृतिक एकता की भावना और सशक्त हुई और सोमनाथ का बार-बार पुनरोद्धार होता रहा।
मैं सोमनाथ की अपनी पिछली यात्राओं की कुछ तस्वीरें साझा कर रहा हूं। यदि आप भी सोमनाथ गए हैं, तो अपनी तस्वीरें #SomnathSwabhimanParv के साथ जरूर शेयर करें।”
“#SomnathSwabhimanParv का ये अवसर, भारत माता के उन असंख्य सपूतों को स्मरण करने का पर्व है, जिन्होंने कभी अपने सिद्धांतों और मूल्यों से समझौता नहीं किया। समय कितना ही कठिन और भयावह क्यों ना रहा हो, उनका संकल्प हमेशा अडिग रहा। हमारी सभ्यता और सांस्कृतिक चेतना के प्रति उनकी निष्ठा अटूट रही। अटूट आस्था के एक हजार वर्ष का ये अवसर, हमें राष्ट्र की एकता के लिए निरंतर प्रयासरत रहने की प्रेरणा देता है।”
“मैं 31 अक्टूबर 2001 को सोमनाथ में आयोजित एक कार्यक्रम की कुछ झलकियां भी आपसे साझा कर रहा हूं। यह वो साल था, जब हमने 1951 में पुनर्निर्मित सोमनाथ मंदिर के उद्घाटन के 50 वर्ष पूर्ण होने का उत्सव मनाया था। 1951 में वो ऐतिहासिक समारोह तत्कालीन राष्ट्रपति डॉ. राजेन्द्र प्रसाद जी की मौजूदगी में संपन्न हुआ था। सोमनाथ मंदिर के पुनर्निर्माण में सरदार पटेल और केएम मुंशी जी के साथ ही कई महान विभूतियों के प्रयास अत्यंत उल्लेखनीय रहे हैं। साल 2001 के इस कार्यक्रम में तत्कालीन प्रधानमंत्री अटल जी और गृह मंत्री आडवाणी जी और कई गणमान्य लोग शामिल हुए थे।
वर्ष 2026 में हम 1951 में हुए भव्य समारोह के 75 वर्ष पूर्ण होने का भी स्मरण कर रहे हैं!”
एक्स समाजमाध्यमावर एक सुभाषित सामायिक करत पंतप्रधानांनी म्हटले आहे:
“श्री सोमनाथ महादेवाची कृपा आणि आशीर्वादाने आपल्या सर्वांचे कल्याण होवो.
सौराष्ट्रदेशे विशदेऽतिरम्ये ज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसम्।
भक्तिप्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये॥”
नेहा कुलकर्णी/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
(रिलीज़ आईडी: 2212388)
आगंतुक पटल : 15
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam