पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी एका सुभाषिताच्या माध्यमातून अधोरेखित केले सद्गुण, चारित्र्य, ज्ञान आणि संपत्तीची कालातीत मूल्ये
प्रविष्टि तिथि:
07 JAN 2026 8:57AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय परंपरेच्या अक्षय ज्ञानाचे स्मरण करत, राष्ट्रीय जीवन आणि वैयक्तिक आचरणाला दिशा देणाऱ्या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले. खऱ्या सौंदर्याला सद्गुणांमुळे शोभा येते, कुळाची प्रतिष्ठा चारित्र्यामुळे उंचावते, ज्ञानाचे सार्थक सिद्धीमुळे होते आणि संपत्तीला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो तो तिच्या जबाबदार उपभोग किंवा विनियोगामुळे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
ही मूल्ये केवळ शाश्वत नसून ती समकालीन समाजातही अत्यंत प्रासंगिक आहेत, असे त्यांनी नमूद केले. भारताची प्रगती, जबाबदारी आणि सौहार्दाच्या दिशेने होणारी वाटचाल याच मूल्यांवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.
‘एक्स’वर एक संस्कृत सुभाषित सामायिक करताना मोदी यांनी लिहिलेः
“गुणो भूषयते रूपं शीलं भूषयते कुलम्।
सिद्धिर्भूषयते विद्यां भोगो भूषयते धनम्॥”
***
NitinFulluke/ShaileshPatil/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2212002)
आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam