शिक्षण मंत्रालय
पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणांचे उर्दू संकलन असलेल्या 'खुत्बत-ए-मोदी: लाल किला की फसील से' या पुस्तकाचे धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते प्रकाशन
प्रविष्टि तिथि:
05 JAN 2026 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जानेवारी 2026
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज नवी दिल्ली येथे खुत्बत-ए-मोदी: लाल किला की फसील से हे उर्दू भाषेतील पुस्तक प्रकाशित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ते 2025 या कालावधीत लाल किल्ल्यावरून केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणांचे संकलन या पुस्तकात आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय उर्दू भाषा प्रोत्साहन परिषद (एनसीपीयुएल) या नवी दिल्लीतील राष्ट्रीय संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. देशभरात उर्दू भाषेचा प्रचार, संवर्धन आणि प्रसार करणे यासाठी ही संस्था काम करते.
खुत्बत-ए-मोदी हे पुस्तक उर्दूत प्रकाशित झाल्याबद्दल प्रधान यांनी आनंद व्यक्त केला. हे भाषांतर म्हणजे भाषांना जोडणारे एक महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधानांच्या भाषणांमध्ये अंत्योदय (तळाच्या स्तरातल्या माणसाचे उत्थान), गरीबांचे कल्याण, स्वच्छ भारत, राष्ट्रीय एकता आणि 140 कोटी भारतीयांच्या इच्छा-आकांक्षा यांचा उल्लेख आहे. हे सगळे नव्या भारताचे चित्र उभे करणारे आहे, असे प्रधान म्हणाले.
अशा पुस्तकांमुळे नागरिकांना थेट पंतप्रधानांच्या विचारांशी, विकासाच्या प्राधान्यक्रमांशी आणि दृष्टिकोनाशी जोडले जाते. यामुळे व्यापक लोकसहभाग आणि माहितीपूर्ण संवाद साधता येतो, असे मत प्रधान यांनी मांडले. हे पुस्तक देशभरातील ग्रंथालयांमध्ये पोहोचेल आणि विद्यार्थी, संशोधक व वाचकांना विकसित भारताच्या दृष्टिकोनावर व्यापक संवाद साधण्यासाठी प्रोत्साहन देईल असा विश्वास प्रधान यांनी व्यक्त केला.

* * *
निलिमा चितळे/प्रज्ञा जांभेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2211608)
आगंतुक पटल : 25