माहिती आणि प्रसारण मंत्रालय
बदलता भारत – मेरा अनुभव’ सर्जनशील स्पर्धांचे विजेते जाहीर
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2026 12:42PM by PIB Mumbai
भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘बदलता भारत – मेरा अनुभव’ या अभियानांतर्गत घेतलेल्या चार सर्जनशील स्पर्धांचे विजेते जाहीर केले आहेत. या स्पर्धांचे आयोजन मायगव्हच्या सहकार्याने करण्यात आले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षांत देशात झालेल्या परिवर्तनाचे दर्शन घडवणारे वैयक्तिक आणि सर्जनशील अनुभव पाठवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले होते.
‘विकसित भारत@2047’ या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेल्या या अभियानामध्ये विविध वयोगटांतील तसेच विविध पार्श्वभूमीतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. विविध सर्जनशील स्वरूपांतून सहभागी नागरिकांनी परिवर्तनकारी प्रशासन आणि विविध क्षेत्रांतील वेगवान विकासाचे सकारात्मक परिणाम अधोरेखित केले.
या प्रक्रियेमुळे नागरिकांचा सहभाग अधिक व्यापक झाला असून विकसित भारताच्या दिशेने देशाच्या प्रवासात सार्वजनिक सहभागाला बळकटी मिळाली आहे. तळागाळातील सहभागापासून सर्जनशील सादरीकरणांपर्यंत या उपक्रमाने प्रत्येक भारतीयाचा आवाज प्रभावीपणे मांडला.
स्पर्धेच्या विविध विभागातील विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
1. ‘बदलता भारत – मेरा अनुभव’ – इंस्टाग्राम रील स्पर्धा-
- प्रथम पारितोषिक: इंद्रजित सुबोध माशंकर,
- द्वितीय पारितोषिक: मंजरी व्ही. महाजन,
- तृतीय पारितोषिक: मिष्टी लोहारे,
- उत्तेजनार्थ पारितोषिके: मोहम्मद हाझिम राथर, अनुभवी सिन्हा, आयुष्मान बर्मैय्या, सिद्धार्थ एम, कार्तिक भटनागर, ऐश्वर्या कुमावत, अतिश महापात्रा
2. बदलता भारत – मेरा अनुभव’ – युट्युब शॉर्ट चॅलेंज
- प्रथम पारितोषिक: मंथन रोहित,
- द्वितीय पारितोषिक: ज्युनिअर ट्यूब चॅनल,
- तृतीय पारितोषिक: लेखा चेतन कोठारी,
- उत्तेजनार्थ पारितोषिके: सौमिता दत्ता, हैमंती मेटे, दिनेश चोटिया, दिव्या बिश्नोई, तपेश, सिद्धार्थ एम., दिनेश कुमार
3. शॉर्ट ऑडिओ वसूल स्पर्धा – ‘स्टोरी ऑफ न्यू इंडिया -
- प्रथम पारितोषिक: सुशोवन मन्ना,
- द्वितीय पारितोषिक: पप्पे सोम,
- तृतीय पारितोषिक: रवि परिहार,
- उत्तेजनार्थ पारितोषिके: दिनेश चोटिया, सिद्धार्थ एम.
4. ‘बदलता भारत – मेरा अनुभव’ – ब्लॉग लेखन स्पर्धा -
- प्रथम पारितोषिक: कृष्णा गुप्ता,
- द्वितीय पारितोषिक: सिंजिनी चॅटर्जी,
- तृतीय पारितोषिक: ब्रिंदा सोमाणी,
- उत्तेजनार्थ पारितोषिके: नूपुर जोशी, त्रिशा सिंग बघेल, मीनाक्षी भन्साळी, विश्वनाथ क्लेअर, नंदिनी भावसर, श्रीराम गणेश, अपूर्वा
माहिती व प्रसारण मंत्रालयाने ‘बदलता भारत - मेरा अनुभव’ या अभियानातील सर्व विजेते आणि सहभागींचे ‘विकसित भारत’च्या अनुभव कथनासाठी दिलेल्या उत्स्फूर्त योगदानाबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच, या परिवर्तनाच्या प्रवासात सर्जनशीलतेचा उत्साह कायम ठेवावा, असे आवाहन मंत्रालयाने सर्व विजेत्यांना केले आहे.
***
हर्षल अकुडे/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2211119)
आगंतुक पटल : 26