पंतप्रधान कार्यालय
थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आदरांजली
प्रविष्टि तिथि:
03 JAN 2026 8:07AM by PIB Mumbai
थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सावित्रीबाई फुले यांना आदरांजली वाहिली आहे. सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण जीवन सेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठी वाहून घेतले, असे मोदी यांनी सामाजिक माध्यमावरील एका संदेशात म्हटले आहे.
सावित्रीबाई फुले या समता, न्याय आणि करुणा या मूल्यांप्रति कटिबद्ध होत्या. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे, असा त्यांचा दृढ विश्वास होता, असे मोदी यांनी नमूद केले. सावित्रीबाई फुले यांनी वंचित आणि दुर्बल घटकांच्या सेवेसाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मोदी यांनी अधोरेखित केले. समावेशक आणि सक्षम समाज उभारण्याच्या देशाच्या प्रयत्नांना आजही सावित्रीबाई फुले यांचे विचार आणि कार्य प्रेरणा देतात.
एक्स’ या सामाजिक माध्यमावरील एका संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त स्मरण करतो. ज्यांचे संपूर्ण जीवन सेवा आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तनासाठी समर्पित होते. समता, न्याय आणि करुणा या तत्त्वांप्रती त्या कटिबद्ध होत्या. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वाधिक प्रभावी साधन आहे, असा त्यांचा दृढ विश्वास होता. ज्ञान आणि शिक्षणाद्वारे लोकांचे जीवन घडविण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. दुर्बल आणि वंचित घटकांच्या सेवेसाठी केलेले त्यांचे कार्य कायम प्रेरणा देते.
***
हर्षल अकुडे/राज दळेकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2211008)
आगंतुक पटल : 27
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada