पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिल्लीतील राय पिथौरा सांस्कृतिक संकुलामधील पिप्रहवा अवशेषांच्या प्रदर्शनाला नागरिकांनी  भेट द्यावी असे पंतप्रधानांचे आवाहन


पिप्रहवा अवशेषांचे प्रदर्शन हे भगवान बुद्धांचे उदात्त विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेला अनुसरून असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

प्रविष्टि तिथि: 02 JAN 2026 6:16PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथे 3 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 च्या सुमाराला  राय पिथौरा  सांस्कृतिक संकुलामधील ‘पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या’ भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे उद्घाटन करतील. ‘द लाईट अँड द लोटस :रेलिक्स ऑफ द अवेकन वन (प्रकाश आणि कमळ : प्रबुद्धाचे अवशेष)’ असे या प्रदर्शनाचे नाव आहे.

संस्कृती आणि बौद्ध धर्माबद्दल आदर असलेल्या सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, आणि पिप्रहवाचा पवित्र वारसा अनुभवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

शतकाहून अधिक काळानंतर मायदेशी परत आणलेले पिप्रहवा अवशेष, या प्रदर्शनात एकत्र ठेवण्यात आले आहेत, तसेच नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय आणि कोलकाता येथील भारतीय संग्रहालयाच्या संग्रहात जतन केलेले पिप्रहवा येथील अस्सल अवशेष आणि पुरातत्वीय साहित्य देखील या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आले आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी X वरील  पोस्टमध्ये म्हटले आहे:

"उद्या, 3 जानेवारी हा दिवस इतिहास, संस्कृती आणि भगवान बुद्धांच्या आदर्शांनी प्रेरित लोकांसाठी विशेष दिवस आहे.

दिल्लीतील राय पिथौरा सांस्कृतिक संकुलामध्ये, सकाळी 11 वाजता, 'The Light & the Lotus: Relics of the Awakened One’   या भगवान बुद्धांशी संबंधित पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या आंतरराष्ट्रीय  प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.

या प्रदर्शनात पाहता येईल: 

एका शतकाहून अधिक काळानंतर भारतात परत आणलेले पिप्रहवा अवशेष.

नवी दिल्लीतील राष्ट्रीय संग्रहालय आणि कोलकाता येथील भारतीय संग्रहालयाच्या संग्रहात जतन केलेले पिप्रहवा येथील अस्सल अवशेष आणि पुरातत्वीय साहित्य.”

हे प्रदर्शन भगवान बुद्धांचे उदात्त विचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अनुसरून आहे. आपली युवा पिढी आणि आपली समृद्ध संस्कृती यांच्यातील बंध आणखी दृढ करण्याचा हा एक प्रयत्नही आहे. हे अवशेष मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाची मी प्रशंसा करतो.”

दिल्लीतील पवित्र पिप्रहवा अवशेषांच्या भव्य आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची ही झलक. संस्कृती  आणि बौद्ध धर्माप्रति आदर असलेल्या सर्वांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे मी आवाहन करतो.”

***

सोनाली काकडे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 2210968) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam