पंतप्रधान कार्यालय
जीवनाचे ध्येय सद्गुणांनी युक्त असावे, हे अधोरेखित करणारे सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
01 JAN 2026 8:12AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी नववर्ष 2026 च्या आगमनानिमित्त देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
‘ज्ञान, वैराग्य, संपत्ती, शौर्य, सामर्थ्य, शक्ती, स्मरण, स्वातंत्र्य, कौशल्य, बुद्धिमत्ता, संयम आणि कोमलता अशा सद्गुणांनी जीवन युक्त असणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय व्हावे,’असे मोदी यांनी सुभाषितच्या माध्यमातून अधोरेखित केले आहे.
प्राचीन ज्ञानामृत उद्धृत करत पंतप्रधान म्हणाले:
"आपण सर्वांना 2026 च्या मनःपूर्वक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांसाठी नव्या आशा, नवे संकल्प आणि नवा आत्मविश्वास घेऊन येवो, अशी सदिच्छा आहे. जीवनात पुढे जाण्यासाठी सर्वांना प्रेरणा मिळो.
ज्ञानं विरक्तिरैश्वर्यं शौर्यं तेजो बलं स्मृतिः।
स्वातन्त्र्यं कौशलं कान्तिर्धैर्यं मार्दवमेव च ॥”
***
NehaKulkarni/SampadaPatgaonkar/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210447)
आगंतुक पटल : 24
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam