गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी श्री रामजन्मभूमी मंदिरातील रामलल्लाच्या 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त देशवासीयांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
31 DEC 2025 6:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 डिसेंबर 2025
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी श्री रामजन्मभूमी मंदिरातील रामलल्लाच्या 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एक्स (X) या समाज माध्यमावरील एका संदेशात केंद्रीय गृहमंत्र्यांनी म्हटले आहे की,
जय श्री राम! आजच्या अत्यंत पावन तिथीला, दोन वर्षांपूर्वी, 500 वर्षांचा प्रतीक्षाकाळ संपला आणि मोदी जी यांनी श्री रामजन्मभूमी मंदिरात रामलल्लाची 'प्राणप्रतिष्ठा' केली. 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. भगवान श्री रामांच्या आदर्शांच्या आणि जीवन मूल्यांच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक असलेले हे मंदिर, धर्माच्या रक्षणासाठीच्या संघर्षासाठी, सांस्कृतिक आत्मसन्मानाच्या कारणास्तव केलेल्या त्यागासाठी आणि वारसा जपण्याच्या समर्पणासाठी प्रेरणास्रोत राहील. या पावन प्रसंगी, मी श्री रामजन्मभूमी आंदोलनातील सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहतो.
* * *
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2210283)
आगंतुक पटल : 4