पंतप्रधान कार्यालय
उद्यमशील किंवा कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांसाठी काहीही अशक्य नसल्याचे अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधानांनी केले सामायिक
प्रविष्टि तिथि:
29 DEC 2025 9:52AM by PIB Mumbai
उद्यमशील किंवा कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांसाठी काहीही अशक्य नसते, हे अधोरेखित करणारे एक संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामायिक केले आहे -
“नात्युच्चशिखरो मेरुर्नातिनीचं रसातलम्। व्यवसायद्वितीयानां नात्यपारो महोदधिः॥"
या सुभाषिताचा अर्थ असा की, कोणतेही शिखर खूप उंच नसते आणि पाताळाची खोलीही फार नसते! त्याचप्रमाणे, कोणताही महासागर ओलांडण्यासाठी खूप मोठा नसतो. थोडक्यात , उद्यमशील किंवा कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांसाठी जगात काहीही अशक्य नाही.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले
“नात्युच्चशिखरो मेरुर्नातिनीचं रसातलम्।
व्यवसायद्वितीयानां नात्यपारो महोदधिः॥"
***
NehaKulkarni/ShaileshPatil/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2209385)
आगंतुक पटल : 8