पंतप्रधान कार्यालय
पवित्र प्रकाश उत्सवानिमित्त पंतप्रधानांनी श्री गुरु गोविंद सिंह जी यांना वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
27 DEC 2025 10:44AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2025
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज पवित्र प्रकाश उत्सवानिमित्त श्री गुरु गोविंद सिंहजी यांना आदरांजली वाहिली. ते धैर्य, करुणा आणि त्यागाचे अवतार होते आहेत, असे श्री मोदी यांनी सांगितले.
"त्यांचे जीवन आणि शिकवण आपल्याला सत्य, न्याय, नीतिमत्ता आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी प्रेरित करतात. श्री गुरु गोविंद सिंहजी यांचे दृष्टिकोन पिढ्यांना सेवा आणि निःस्वार्थ कर्तव्याकडे मार्गदर्शन करत राहील" असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी 'एक्स' वर पोस्ट केले:
"श्री गुरु गोविंद सिंहजी यांच्या पवित्र प्रकाश उत्सवानिमित्त, आम्ही त्यांना आदरांजली अर्पण करतो. ते धैर्य, करुणा आणि त्यागाचे मूर्त स्वरूप आहेत. त्यांचे जीवन आणि शिकवण आपल्याला सत्य, न्याय, धार्मिकता आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी प्रेरित करते. श्री गुरु गोविंद सिंहजी यांचे दृष्टिकोन पिढ्यानपिढ्या सेवा आणि नि:स्वार्थ कर्तव्याबाबत मार्गदर्शन करत आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला तख्त श्री हरिमंदिरजी पटना साहिबला भेट दिल्याचे फोटो येथे आहेत, जिथे मी श्री गुरु गोविंद सिंहजी आणि माता साहिब कौरजी यांच्या पवित्र जोरे साहिबचे दर्शन देखील घेतले होते."
"ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਦੇ ਪਵਿੱਤਰ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਉਤਸਵ 'ਤੇ ਅਸੀਂ ਉਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਸ਼ਰਧਾ ਸਹਿਤ ਪ੍ਰਣਾਮ ਕਰਦੇ ਹਾਂ। ਉਹ ਹਿੰਮਤ, ਹਮਦਰਦੀ ਅਤੇ ਕੁਰਬਾਨੀ ਦੇ ਪ੍ਰਤੀਕ ਹਨ।ਉਨ੍ਹਾਂ ਦਾ ਜੀਵਨ ਅਤੇ ਸਿੱਖਿਆਵਾਂ ਸਾਨੂੰ ਸੱਚ, ਨਿਆਂ, ਧਰਮ ਲਈ ਖੜ੍ਹੇ ਹੋਣ ਅਤੇ ਮਨੁੱਖੀ ਮਾਣ-ਸਨਮਾਨ ਦੀ ਰਾਖੀ ਲਈ ਪ੍ਰੇਰਿਤ ਕਰਦੀਆਂ ਹਨ। ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਦਾ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀਕੋਣ ਪੀੜ੍ਹੀਆਂ ਨੂੰ ਸੇਵਾ ਅਤੇ ਨਿਰਸਵਾਰਥ ਕਰਤੱਵ ਦੇ ਰਾਹ 'ਤੇ ਰਹਿਨੁਮਾਈ ਕਰਦਾ ਰਹਿੰਦਾ ਹੈ।
ਇਸ ਸਾਲ ਦੀ ਸ਼ੁਰੂਆਤ ਵਿੱਚ ਤਖ਼ਤ ਸ੍ਰੀ ਹਰਿਮੰਦਰ ਜੀ ਪਟਨਾ ਸਾਹਿਬ ਦੀ ਮੇਰੀ ਯਾਤਰਾ ਦੀਆਂ ਇੱਥੇ ਤਸਵੀਰਾਂ ਹਨ, ਜਿੱਥੇ ਮੈਨੂੰ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਅਤੇ ਮਾਤਾ ਸਾਹਿਬ ਕੌਰ ਜੀ ਦੇ ਪਵਿੱਤਰ ਜੋੜਾ ਸਾਹਿਬ ਦੇ ਦਰਸ਼ਨ ਵੀ ਹੋਏ ਸਨ।"
* * *
नितीन फुल्लुके/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2209052)
आगंतुक पटल : 71
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam