गृह मंत्रालय
वीर बाल दिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरु गोबिंद सिंग जी, माता गुजरी जी आणि शूर साहिबजाद्यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या शौर्य आणि बलिदानाचे स्मरण केले
प्रविष्टि तिथि:
26 DEC 2025 1:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 डिसेंबर 2025
केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी वीर बाल दिवसानिमित्ताने गुरु गोबिंदसिंग, माता गुजरी आणि शूर साहिबजाद्यांना त्यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ अभिवादन केले.
एक्स या वर केलेल्या संदेशात शहा यांनी म्हटले आहे की, धर्म व देशाच्या रक्षणासाठी अतिशय लहान वयात गुरु गोबिंदसिंग जींच्या शूर पुत्रांनी केलेले बलिदान हे इतिहासातले एक दुर्मिळ उदाहरण आहे. साहिबजाद्यांमध्ये माता गुजरी व गुरु गोबिंदसिंग जी यांनी रुजविलेले मूल्य, ज्यांनी मानवतेच्या रक्षणाचे बीज रोपले, जे क्रूर अत्याचारींच्या अमानवीय कृत्यांनी जराही विचलित झाले नाहीत, असे शाह यांनी सांगितले. चार साहिबजाद्यांच्या बलिदानाची कहाणी प्रत्येक पिढीपर्यंत पोहचावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वीर बाल दिवस' साजरा करण्याचा पुढाकार घेतला, असे शाह यांनी नमूद केले.
* * *
नेहा कुलकर्णी/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208789)
आगंतुक पटल : 11