राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नाताळच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
24 DEC 2025 10:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नाताळच्या पूर्वसंध्येला देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.
एका संदेशात राष्ट्रपतींनी म्हटले आहे की, “नाताळच्या या शुभ प्रसंगी, मी सर्व नागरिकांना, विशेषतः ख्रिश्चन समाजातील माझ्या बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा आणि सदिच्छा देते.
आनंद आणि उत्साहाचा सण असलेला नाताळ, प्रेम आणि करुणेचा संदेश देतो. हा सण आपल्याला मानवतेच्या कल्याणासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या त्यागाचे स्मरण करून देतो. हा पवित्र प्रसंगी आपल्याला समाजात शांतता, सलोखा, समानता आणि सेवेची मूल्ये अधिक दृढ करण्यासाठी प्रेरणा मिळते.
चला, आपण येशू ख्रिस्ताने दाखवलेल्या मार्गाचे अनुसरण करूया आणि दयाळूपणा तसेच परस्परांमध्ये सलोखा, एकोपा निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन देणारा समाज निर्माण करण्याच्या दिशेने कार्य करण्याचा संकल्प करूया.”
Please click here to see the President's message
* * *
शैलेश पाटील/सुवर्णा बेडेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2208343)
आगंतुक पटल : 6