राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार - 2025 प्रदान
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2025 7:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (23, डिसेंबर 2025) राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित पुरस्कार समारंभात राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार - 2025 प्रदान केले.
राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराच्या दुसऱ्या आवृत्तीत, विज्ञानरत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा आणि विज्ञान टीम या चार श्रेणींमध्ये 24 पुरस्कार प्रतिष्ठित शास्त्रज्ञांना प्रदान करण्यात आले.
राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराचा उद्देश विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञान-प्रणित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रात वैयक्तिकरित्या किंवा सांघिकरीत्या दिलेल्या उल्लेखनीय आणि प्रेरणादायी योगदानाचा सन्मान करणे हा आहे.
राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार विजेत्यांची यादी
* * *
निलिमा चितळे/सुषमा काणे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2207883)
आगंतुक पटल : 12