गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी स्वामी श्रद्धानंद यांच्या बलिदान दिनानिमित्त वाहिली आदरांजली
स्वामी श्रद्धानंद सरस्वती जी यांनी 'स्वराज्य' आणि 'भारतीय संस्कृती' या दोन्ही क्षेत्रांत समान योगदान दिले आणि आयुष्यभर सामाजिक अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा दिला
स्त्री शिक्षण आणि भारतीय बौद्धिक परंपरेला चालना देण्यासाठी त्यांनी अविस्मरणीय भूमिका बजावली
प्रविष्टि तिथि:
23 DEC 2025 3:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 डिसेंबर 2025
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी स्वामी श्रद्धानंद यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.
‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये अमित शाह यांनी सांगितले की, स्वामी श्रद्धानंद सरस्वती जी यांनी स्वराज्य आणि भारतीय संस्कृतीसाठी मोलाचे कार्य केले. त्यांनी आयुष्यभर सामाजिक दुष्प्रवृत्तींशी लढा दिला आणि स्त्री शिक्षणासाठी तसेच भारतीय बौद्धिक वारसा जपण्यासाठी दिलेले त्यांचे योगदान विसरता येणार नाही. स्वामी श्रद्धानंद जी यांना त्यांच्या बलिदान दिनी त्यांना मी नमन करतो.
* * *
नितीन फुल्लुके/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2207698)
आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam