माहिती आणि प्रसारण मंत्रालय
सरकारशी संबंधित खोट्या बातम्यांसदर्भात 8799711259 या क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचे पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक युनिटकडून जनतेला आवाहन
प्रविष्टि तिथि:
19 DEC 2025 8:00PM by PIB Mumbai
भारत सरकारशी संबंधित खोट्या बातम्या आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवण्याला आळा घालण्याच्या उद्देशाने, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत पत्र सूचना कार्यालयात (पीआयबी) नोव्हेंबर 2019 मध्ये एक फॅक्ट चेक युनिट (FCU) स्थापन करण्यात आले आहे.
भारत सरकारशी संबंधित विषयांवर प्रसारित होणाऱ्या कोणत्याही बातम्या किंवा माहितीच्या संदर्भात तक्रार किंवा तथ्य तपासणीची विनंती पुढील माध्यमांद्वारे करता येईल :
व्हॉट्सॲप हॉटलाइन- +918799711259,
ईमेल आयडी- factcheck@pib.gov.in आणि
पीआयबी फॅक्ट चेक युनिटच्या संकेतस्थळ - https://factcheck.pib.gov.in
पीआयबीचे फॅक्ट चेक युनिट प्राप्त बातम्या किंवा माहितीची पडताळणी खालीलप्रमाणे करते:
पीआयबी फॅक्ट चेक युनिट स्वतःहून (सुओ-मोटो) तथ्य तपासणीची दखल घेते, तसेच आपले संकेतस्थळ किंवा व्हॉट्सॲप हॉटलाइनवर तक्रारी स्वीकारते.
हे युनिट प्राप्त माहितीची पडताळणी करून ती फॅक्ट चेक युनिटच्या कार्यक्षेत्रात येते की नाही, हे निश्चित करते.
अधिकृत स्रोतांकडून प्राप्त माहितीची सत्यता पडताळल्यानंतर, फॅक्ट चेक युनिट माहिती, शिक्षण आणि संवाद (IEC) धोरणाचा वापर करून समाज माध्यमांवर प्रसारासाठी योग्य असलेल्या सर्जनशील आशयाद्वारे जागरूकता निर्माण करते.
फॅक्ट चेक युनिट तथ्य तपासलेली आणि अचूक माहिती आपल्या समाज माध्यम हँडलवर पोस्ट करते.
पीआयबी फॅक्ट चेक युनिट (FCU) भारत सरकारशी संबंधित ऑनलाइन आशयावर लक्ष ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, पीआयबी फॅक्ट चेक युनिटने खोट्या दाव्यांची त्वरित तथ्य तपासणी करून, अधिकृत माहिती देऊन आणि अचूक जनसंवाद सुनिश्चित करून, ऑनलाइन प्रसारित होणाऱ्या चुकीच्या माहितीला आणि द्वेषपूर्ण प्रचाराला सक्रियपणे प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे दिशाभूल करणाऱ्या आणि भारतविरोधी प्रचाराचा प्रसार रोखण्यात मदत झाली.
माहिती आणि प्रसारण तसेच संसदीय कार्य राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज राज्यसभेत सुजीत कुमार यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.
***
निलिमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2206848)
आगंतुक पटल : 16