पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ ओमान पुरस्काराने सन्मानित
प्रविष्टि तिथि:
18 DEC 2025 7:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 डिसेंबर 2025
ओमानचे सुलतान महामहिम हैथम बिन तारिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारत-ओमान संबंधांमधील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल आणि दूरदर्शी नेतृत्वासाठी 'ऑर्डर ऑफ ओमान' पुरस्काराने सन्मानित केले.
पंतप्रधानांनी हा पुरस्कार दोन्ही देशांमधील शतकानुशतकांच्या घनिष्ठ मैत्रीला समर्पित केला आणि हा पुरस्कार म्हणजे भारताची 140 कोटी जनता आणि ओमानच्या जनतेमधील परस्पर जिव्हाळा आणि प्रेम यांना केलेले हे अभिवादन असल्याचे सांगितले.
दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंधांना 70 वर्षे पूर्ण होत असतानाच पंतप्रधानांच्या ओमान भेटीत त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने, या प्रसंगाला आणि धोरणात्मक भागीदारीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महामहिम सुलतान काबूस बिन सईद यांनी 1970 मध्ये सुरु केलेला 'ऑर्डर ऑफ ओमान' हा सन्मान सार्वजनिक जीवनातील आणि द्विपक्षीय संबंधांमधील योगदानाबद्दल निवडक जागतिक नेत्यांना प्रदान करण्यात आला आहे.
निलीमा चितळे/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2206252)
आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam