1) सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार
-आर्थिक आणि व्यावसायिक बंध अधिक मजबूत करणे आणि ते अधिक घनिष्ठ करणे
- व्यापार अडथळे कमी करून आणि एक स्थिर चौकट तयार करून दोन्ही देशांमधील व्यापार वाढवणे.
- अर्थव्यवस्थेच्या सर्व प्रमुख क्षेत्रांमध्ये संधी उपलब्ध करून देणे, आर्थिक वाढीला चालना देणे, रोजगार निर्माण करणे आणि दोन्ही देशांदरम्यान गुंतवणूक ओघाला प्रोत्साहन देणे
2) सागरी वारसा आणि संग्रहालये क्षेत्रातील सामंजस्य करार
- लोथल येथील राष्ट्रीय सागरी वारसा संकुलासह सागरी संग्रहालयांना पाठबळ देण्यासाठी सहयोगी भागीदारी स्थापित करणे.
- सामायिक सागरी वारसा जपण्यासाठी, पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि द्विपक्षीय सांस्कृतिक संबंध मजबूत करण्यासाठी कलाकृती आणि तज्ज्ञ माहितीचे आदानप्रदान, संयुक्त प्रदर्शने, संशोधन आणि क्षमता बांधणी सुलभ करणे.
3) कृषी आणि संलग्न क्षेत्रांमधील सामंजस्य करार
- कृषी आणि पशुसंवर्धन तसेच मत्स्यव्यवसाय यांसारख्या संलग्न क्षेत्रांमधील एक सर्वसमावेशक दस्तऐवज चौकट
- कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती, फलोत्पादनाला चालना, एकात्मिक शेती प्रणाली आणि सूक्ष्म सिंचन यांमध्ये सहकार्य.
4) उच्च शिक्षण क्षेत्रातील सामंजस्य करार
- मानवी आणि सामाजिक-आर्थिक विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेले नवीन ज्ञान आणि नाविन्यपूर्ण पद्धती निर्माण करण्याकरिता, परस्पर हिताच्या क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन, विशेषतः उपयोजित संशोधन करताना, प्राध्यापक, संशोधक आणि विद्वानांमधील आदानप्रदानाला प्रोत्साहन देणे.
5) पौष्टिक भरडधान्यांची लागवड आणि कृषी-अन्न नवोन्मेषात सहकार्यासाठी कार्यकारी कार्यक्रम
- पौष्टिक भरडधान्यांचे उत्पादन, संशोधन आणि प्रसाराला चालना देण्यासाठी भारताचे वैज्ञानिक कौशल्य आणि ओमानच्या अनुकूल कृषी-हवामान परिस्थितीचा उपयोग करून सहकार्यासाठी एक आराखडा स्थापित करणे.
6) सागरी सहकार्यावरील संयुक्त दृष्टिकोन दस्तऐवजाचा स्वीकार
- प्रादेशिक सागरी सुरक्षा, नील अर्थव्यवस्था आणि सागरी संसाधनांच्या शाश्वत वापराच्या क्षेत्रात सहकार्य अधिक बळकट करणे.