रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वे संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण पूर्ण करण्याच्या जवळ पोहचली, 99.2% विद्युतीकरण केले पूर्ण, यूके (39%), रशिया (52%) आणि चीन (82%) या देशांना टाकले मागे
प्रविष्टि तिथि:
17 DEC 2025 5:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 डिसेंबर 2025
भारतीय रेल्वेवरील रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणाचे काम जलदगतीने सुरु आहे. आतापर्यंत, ब्रॉड गेज नेटवर्कचे सुमारे 99.2% विद्युतीकरण झाले आहे.उर्वरित नेटवर्कमधील विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
रेल्वे विद्युतीकरणाच्या बाबतीत, जागतिक स्तरावर भारतीय रेल्वेची कामगिरी लक्षणीय ठरली आहे. इंटरनॅशनल युनियन ऑफ रेल्वेजच्या(UIC) जून 2025 च्या अद्ययावत अहवालानुसार, महत्त्वाच्या रेल्वे प्रणालींमधील रेल्वे विद्युतीकरणाची स्थिती पुढीलप्रमाणे आहे:
देश रेल्वे विद्युतीकरण
युनायटेड किंग्डम 39%
फ्रान्स 60%
स्पेन 67%
रशिया 52%
जपान 64%
चीन 82%
स्वित्झर्लंड 100%
आर्थिक वर्ष 2023-24 आणि 2024-25 दरम्यान अनुक्रमे 7,188 आणि 2,701 रूट किलोमीटर विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, सर्व नवीन मार्ग/बहु-मार्गीकरण प्रकल्पांना विद्युतीकरणासह मंजुरी दिली जात आहे आणि त्यांचे बांधकाम केले जात आहे.
ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमधील विद्यमान ब्रॉडगेज नेटवर्कचे 100% विद्युतीकरण पूर्ण करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, सर्व नवीन मार्ग/बहुमार्गी प्रकल्पांना विद्युतीकरणासह मंजुरी दिली जात आहे आणि त्यांचे बांधकाम केले जात आहे. आसाममध्ये 92% विद्युतीकरण झाले असून, उर्वरित नेटवर्कमधील विद्युतीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.
रेल्वे विद्युतीकरणाची अद्ययावत माहिती इंडियन रेल्वेच्या संकेतस्थळावर पुढील लिंकवर उपलब्ध आहे:
https://indianrailways.gov.in/railwayboard/uploads/directorate/ele_engg/2025/Status%20of%20Railway%C2%A0Electrification%20as%20on%C2%A030_11_2025.pdf
भारतीय रेल्वे, जवळपास संपूर्ण रेल्वे विद्युतीकरण करत आणि अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर करत, शाश्वत कामकाजाप्रति वचनबद्ध आहे. यामध्ये धोरणात्मक ऊर्जा खरेदी नियोजनावर आधारित सौर, पवन आणि इतर अक्षय स्रोतांच्या संयोजनाचा समावेश आहे, ज्यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास हातभार लागतो.
केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
सुषमा काणे/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
(रिलीज़ आईडी: 2205415)
आगंतुक पटल : 21