पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

विश्वचषक विजेत्या भारतीय स्क्वाश संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 15 DEC 2025 2:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 डिसेंबर 2025

एसडीएटी स्क्वाश विश्व चषक 2025 जिंकून पहिल्यांदाच जागतिक अजिंक्यपद जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय स्क्वाश संघांचे अभिनंदन केले आहे. जोशना चिन्नप्पा, अभय सिंग, वेलावन सेंथिल कुमार आणि अनाहत सिंग यांच्या असामान्य कामगिरीची मोदी यांनी प्रशंसा केली आहे. या खेळाडूंची समर्पित वृत्ती, शिस्त आणि निर्धार यामुळे देशाचा अभिमान उंचावला आहे. या ऐतिहासिक कामगिरीतून जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंच्या वाढत्या सामर्थ्याचे प्रतिबिंब दिसत आहे.  

हा विजय देशभरातील असंख्य तरुण खेळाडूंना प्रेरणा देईल आणि भारतातील युवकांमध्ये स्क्वाश या खेळाची लोकप्रियता  आणखी वाढवेल, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली.
मोदी यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये सांगितलेः

“एसडीएटी स्क्वाश विश्वचषक 2025 मध्ये इतिहास घडवून, पहिल्यांदाच विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय स्क्वाश संघाचे अभिनंदन!

जोशना चिनप्पा, अभय सिंग, वेलवन सेंथिल कुमार आणि अनाहत सिंग यांनी कमालीची समर्पित वृत्ती आणि निर्धाराचे दर्शन घडवले आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण देशभरात अभिमानाची भावना आहे.  या विजयामुळे आपल्या युवकांमध्ये स्क्वॅश खेळाची लोकप्रियताही वाढेल.

@joshnachinappa

@abhaysinghk98

@Anahat_Singh13”

 

 


नेहा कुलकर्णी/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2204034) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Bengali-TR , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam