पंतप्रधान कार्यालय
सम्राट पेरुम्बीदुगु मुथरैयार दुसरे यांच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकिटाच्या अनावरणाचे पंतप्रधानांनी केले स्वागत
प्रविष्टि तिथि:
14 DEC 2025 10:05PM by PIB Mumbai
उपराष्ट्रपती थिरु सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते सम्राट पेरुम्बीदुगु मुथरैयार दुसरे (सुवरन मारन) यांच्या सन्मानार्थ विशेष टपाल तिकिटाच्या अनावरण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला आहे.
सम्राट पेरुम्बीदुगु मुथरैयार दुसरे हे लक्षणीय दूरदृष्टी, विचारीपणा आणि धोरणात्मक प्रतिभेने संपन्न असलेले एक प्रभावी प्रशासक होते हे त्यांनी आवर्जून नमूद केले. सम्राटांची न्यायाप्रती असलेली बांधिलकी आणि तमिळ संस्कृतीचे महान संरक्षक म्हणून त्यांची उल्लेखनीय भूमिका पंतप्रधानांनी अधोरेखित केली.
ज्यांचे योगदान येणाऱ्या पिढ्यांना प्रेरित करत राहिले आहे अशा सन्माननीय सम्राटांच्या असामान्य जीवनाबद्दल आणि वारशाबद्दल देशवासीयांनी, विशेषतः तरुणांनी अधिकाधिक जाणून घ्यावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
एक्स मंचावर लिहिलेल्या एका स्वतंत्र संदेशात पंतप्रधान मोदी लिहितात:
“सम्राट पेरुम्बीदुगु मुथरैयार दुसरे (सुवरन मारन) यांच्या सन्मानार्थ उपराष्ट्रपती थिरु सी.पी.राधाकृष्णन यांनी विशेष टपाल तिकिट जारी केल्याबद्दल आनंदित झालो आहे. लक्षणीय दूरदृष्टी, विचारीपणा आणि धोरणात्मक प्रतिभेने संपन्न असलेले सम्राट एक प्रभावी प्रशासक होते. न्यायाप्रती असलेल्या बांधिलकीबद्दल ते प्रख्यात होते. तसेच ते तमिळ संस्कृतीचे महान संरक्षक देखील होते. त्यांच्या असामान्य जीवनाबद्दल वाचन करण्याचे आवाहन मी अधिकाधिक तरुणांना करतो
@VPIndia
@CPR_VP”
“பேரரசர் இரண்டாம் பெரும்பிடுகு முத்தரையரை (சுவரன் மாறன்) கௌரவிக்கும் வகையில் சிறப்பு அஞ்சல் தலையைக் குடியரசு துணைத்தலைவர் திரு சி.பி. ராதாகிருஷ்ணன் அவர்கள் வெளியிட்டது மகிழ்ச்சி அளிக்கிறது. ஆற்றல்மிக்க நிர்வாகியான அவருக்குப் போற்றத்தக்க தொலைநோக்குப் பார்வையும், முன்னுணரும் திறனும், போர்த்தந்திர ஞானமும் இருந்தன. நீதியை நிலைநாட்டுவதில் அவர் உறுதியுடன் செயல்பட்டவர். அதேபோல் தமிழ் கலாச்சாரத்திற்கும் அவர் ஒரு மகத்தான பாதுகாவலராக இருந்தார். அவரது அசாதாரண வாழ்க்கையைப் பற்றி அதிகமான இளைஞர்கள் படிக்க வேண்டும் என்று நான் கேட்டுக்கொள்கிறேன்.
@VPIndia
@CPR_VP”
***
JaydeviPujariSwami/SanjanaChitnis/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2203925)
आगंतुक पटल : 5
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam