पंतप्रधान कार्यालय
फ्रान्समधील सेर्जी येथील तिरुवल्लुवर यांचा पुतळा हा फ्रान्स आणि भारत यांच्यातील सामायिक सांस्कृतिक संबंधांचा एक सुंदर पुरावा : पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2023 8:10PM by PIB Mumbai
फ्रान्समधील सेर्जी येथील तिरुवल्लुवर यांचा पुतळा हा फ्रान्स आणि भारत यांच्यातील सामायिक सांस्कृतिक संबंधांचा एक सुंदर पुरावा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
फ्रान्समधील सेर्जी शहराचे महापौर, जीन-पॉल जँडॉन यांनी फ्रान्समधील सेर्जी येथे तिरुवल्लुवर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
जीन-पॉल जँडॉन यांच्या 'एक्स' (X) या समाज माध्यमावरील संदेशावर प्रतिक्रिया देताना, पंतप्रधानांनी 'एक्स'वर लिहिले आहे;
“फ्रान्समधील सेर्जी येथील तिरुवल्लुवर यांचा पुतळा हा आपल्या सामायिक सांस्कृतिक संबंधांचा एक सुंदर पुरावा आहे. तिरुवल्लुवर हे ज्ञान आणि प्रज्ञेचे प्रतीक म्हणून उभे आहेत. त्यांचे लेखन जगभरातील लाखो लोकांना प्रेरणा देते.”
“பிரான்சின் செர்ஜியில் உள்ள திருவள்ளுவர் சிலை, நமது கலாச்சாரப் பிணைப்புகளுக்கு அழகான ஒரு சான்றாகும். திருவள்ளுவர் ஞானம் மற்றும் அறிவின் அடையாளமாக உயர்ந்து நிற்கிறார். அவரது எழுத்துக்கள் உலகம் முழுவதும் உள்ள லட்சக் கணக்கானவர்களை ஊக்குவிக்கின்றன.”
***
आशिष सांगळे/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2203505)
आगंतुक पटल : 4
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam