पंतप्रधान कार्यालय
देशाच्या वस्त्रोद्योग परिसंस्थेतील 11 वर्षांमधल्या ऐतिहासिक परिवर्तनावर प्रकाश टाकणारा लेख पंतप्रधानांनी केला सामायिक
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2025 4:30PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक लेख सामायिक केला आहे ज्यामध्ये गेल्या अकरा वर्षांत भारताच्या वस्त्रोद्योग परिसंस्थेत झालेल्या उल्लेखनीय परिवर्तनावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या परिवर्तनामुळे हा काळ मूल्य साखळीतील अभूतपूर्व वाढ, आधुनिकीकरण आणि समावेशनाचा ठरला आहे.
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांच्या X वरील पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले:
"गेल्या 11 वर्षांत भारताच्या वस्त्रोद्योग परिसंस्थेत ऐतिहासिक बदल झाले आहेत: मजबूत पायाभूत सुविधा, विस्तारित बाजारपेठ, वाढलेले कौशल्य, व्यापक समावेश आणि बरेच काही. एक मूल्य साखळी जी आता रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण आणि जागतिक स्पर्धात्मकतेला चालना देते!
श्री @girirajsinghbjp द्वारे लिहिलेला हा लेख विकासाच्या गाभ्याचे स्पष्टीकरण देतो, नक्की वाचा!”
***
निलिमा चितळे/नंदिनी मथुरे/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2203186)
आगंतुक पटल : 9