पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवराज पाटील यांच्या निधनाबद्दल व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2025 10:26AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिवराज पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. आपले जीवन सार्वजनिक सेवेसाठी समर्पित करणारे एक अनुभवी नेते, म्हणून त्यांचे वर्णन केले.
आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि लोकसभेचे अध्यक्ष अशा विविध पदांवर कार्यरत राहून देशाची सेवा करणाऱ्या शिवराज पाटील यांच्या निधनाने त्यांना दुःख झाले, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. पाटील हे सामाजिक कल्याणासाठी त्यांच्या वचनबद्धतेसाठी आणि लोकशाही मूल्यांप्रती त्यांच्या दृढ समर्पणासाठी ओळखले जात होते, असेही त्यांनी लिहिले आहे.
पंतप्रधानांनी गेल्या काही वर्षांत पाटील यांच्याशी झालेल्या अनेक संवादांची आठवण करून दिली. काही महिन्यांपूर्वी पाटील आपले निवासस्थानी भेट दिली तेव्हा त्यांची सर्वात अलीकडील भेट झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.
एक्स या समाज माध्यमावरील वेगवेगळ्या संदेशात, पंतप्रधान मोदींनी लिहिले:
“श्री शिवराज पाटील जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. ते एक अनुभवी नेते होते. सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याच्या ध्येयाने ते झपाटले होते. गेल्या काही वर्षांत त्यांच्यासोबत माझे अनेक वेळा संवाद झाले, त्यापैकी सर्वात अलीकडील भेट काही महिन्यांपूर्वीच जेव्हा ते माझ्या निवासस्थानी आले होते तेव्हा झाली होती. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. ओम शांती. ”
“श्री शिवराज पाटील जी यांच्या निधनाने दुःख झाले आहे. ते एक अनुभवी नेते होते. सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी आमदार, खासदार, केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे तसेच लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम केले. समाजाच्या कल्याणासाठी योगदान देण्याच्या ध्येयाने ते झपाटले होते. गेल्या काही वर्षांत त्यांच्यासोबत माझे अनेक वेळा संवाद झाले, त्यापैकी सर्वात अलीकडील भेट काही महिन्यांपूर्वीच जेव्हा ते माझ्या निवासस्थानी आले होते तेव्हा झाली होती. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. ओम शांती.”
***
नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2202910)
आगंतुक पटल : 11