पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बचाव कार्याच्या यशाने प्रत्येकजण भावूक झाला : पंतप्रधान नरेंद्र मोदी


उत्तरकाशी बोगदा बचाव मोहिमेशी संबंधित सर्वांच्या जिद्दीला पंतप्रधानांचा सलाम

बचाव कार्याचे यश सर्वांना भावूक करणारे: पंतप्रधान

सुटका झालेल्या कामगारांच्या धैर्य आणि संयमाचे पंतप्रधानांनी केले कौतुक

श्रमिक बांधवांच्या उत्तम आरोग्याची केली कामना

प्रविष्टि तिथि: 28 NOV 2023 11:50PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरकाशी बोगदा बचाव मोहिमेशी संबंधित सर्व लोकांच्या जिद्दीला सलाम केला आहे.

उत्तरकाशी बोगद्यातील आपल्या श्रमिक बांधवांच्या बचाव कार्याच्या यशाने सर्वजण भावूक झाले आहेत, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. बोगद्यात अडकलेल्या लोकांच्या धैर्य आणि संयमाचे कौतुक करत, त्यांनी त्यांच्या उत्तम आरोग्याची कामना केली. या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांनी मानवता आणि संघकार्याचे अद्भुत उदाहरण साकारले आहे, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे :

उत्तरकाशीमध्ये आपल्या श्रमिक बांधवांच्या बचाव अभियानाला मिळालेले यश प्रत्येकाला भावूक करणारे आहे.

जे बोगद्यात अडकलेले साथीदार होते, त्यांना मी सांगू इच्छितो की तुमचे साहस आणि धैर्य सर्वांना प्रेरणा देत आहे. मी तुम्हा सर्वांच्या कुशलतेची आणि उत्तम आरोग्याची कामना करतो.

दीर्घ प्रतीक्षेनंतर आता आपले हे साथीदार आपल्या प्रियजनांना भेटणार ही अत्यंत समाधानाची बाब आहे. या सर्वांच्या कुटुंबियांनीही या आव्हानात्मक काळात दाखवलेले संयम आणि धैर्य कौतुकास्पद आहे.

मी या बचाव मोहिमेशी संबंधित सर्वांच्या जोशाला सलाम करतो. त्यांच्या शौर्याने आणि निश्चयशक्तीने आपल्या श्रमिक बांधवांना नवे जीवन दिले आहे. या अभियानात सहभागी प्रत्येकाने मानवता आणि संघकार्याचे एक अद्वितीय उदाहरण घडवले आहे.

***

आशिष सांगळे / श्रद्धा मुखेडकर / परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2202843) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam