पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी साधला संवाद
प्रविष्टि तिथि:
11 DEC 2025 9:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीव्दारे संवाद साधला.
उभय नेत्यांनी भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधांमधील स्थिर प्रगतीचा आढावा घेतला आणि महत्त्वाच्या प्रादेशिक तसेच जागतिक घडामोडींवर विचारविनिमय केला.
जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीला चालना देण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्रितपणे काम करत राहतील, याचा पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला.
‘एक्स’ वरील एका पोस्टमध्ये मोदी म्हणाले:
“अध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत माझी अत्यंत सौहार्दपूर्ण आणि फलदायी चर्चा झाली. आम्ही आपल्या द्विपक्षीय संबंधांमधील प्रगतीचा आढावा घेतला तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर चर्चा केली. भारत आणि अमेरिका जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्र काम करत राहतील.”
@realDonaldTrump
सुवर्णा बेडेकर/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2202651)
आगंतुक पटल : 11
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam