पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

स्वच्छ भारत अभियानात जनतेने सहभाग घ्यावा - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आवाहन

प्रविष्टि तिथि: 30 SEP 2023 11:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 सप्‍टेंबर 2023

 

‘स्वच्छ भारत’ ही देशातील सर्व नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे आणि या दिशेने जनतेचा सहभाग खूप महत्वाचा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. स्वच्छता राखण्यासाठी आणि देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सर्वांनी उद्या सकाळी 10 वाजता एक तास वेळ काढावा, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.

पंतप्रधानांनी एक्स या समाज माध्यमावरील संदेशात जनतेला हे आवाहन केले:

“स्वच्छ भारत ही देशातील सर्व कुटुंबांची सामूहिक जबाबदारी आहे. या दिशेने जनसहभागाचे प्रत्येक प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. चला, उद्या सकाळी 10 वाजता एकत्र येऊन एक तास स्वच्छतेसाठी समर्पित करूया आणि देशाच्या उज्ज्वल भविष्याच्या निर्मितीत आपला हातभार लावूया”.

 

* * *

नितीन फुल्‍लुके/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2202231) आगंतुक पटल : 23
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Bengali , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam