माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निष्पक्ष स्पर्धा आणि अचूक टेलिव्हिजन रेटिंग सुनिश्चित करण्यासाठी सरकारने टीआरपी मार्गदर्शक तत्त्वांच्या मसुद्यात केली सुधारणा


सुधारित टीआरपी प्रणाली प्रेक्षकांच्या वैविध्यपूर्ण आणि विकसित होत असलेल्या माध्यम उपभोगाच्या सवयी प्रतिबिंबित करणार

प्रविष्टि तिथि: 10 DEC 2025 6:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025

भारतातील टेलिव्हिजन रेटिंग, हे ‘टेलिव्हिजन रेटिंग एजन्सीज इन इंडिया, 2014’, च्या धोरण मार्गदर्शक तत्त्वांद्वारे नियंत्रित केले जाते.

02.07.2025 रोजी, सरकारने सार्वजनिक सल्लामसलतीसाठी या मार्गदर्शक तत्त्वांमधील दुरुस्तीचा मसुदा प्रकाशित केला होता. निष्पक्ष स्पर्धेला चालना देणे, अधिक अचूक आणि प्रातिनिधिक डेटा संच तयार करणे आणि देशभरातील प्रेक्षकांच्या वैविध्यपूर्ण आणि विकसित होत असलेल्या माध्यम उपभोगाच्या सवयींचे प्रतिबिंब टीआरपी प्रणालीमधून उमटेल, याची खात्री करणे, हे  प्रस्तावित सुधारणांचे उद्दिष्ट आहे.

मिळालेल्या माहितीचे परीक्षण केल्यानंतर, दुरुस्तीचा सुधारित मसुदा सार्वजनिक सल्लामसलतीसाठी 06.11.2025 रोजी प्रकाशित करण्यात आला.

माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी आज लोकसभेत डॉ. किरसन नामदेव आणि चरणजीत सिंह चन्नी यांच्या प्रश्नांवरील उत्तरात ही माहिती दिली.


शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(रिलीज़ आईडी: 2201735) आगंतुक पटल : 9
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Punjabi , Tamil , Telugu , Kannada