उपराष्ट्रपती कार्यालय
अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावली सणाचा समावेश करण्याच्या युनेस्कोने घेतलेल्या निर्णयाचे उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी स्वागत केले
प्रविष्टि तिथि:
10 DEC 2025 5:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025
युनेस्कोने अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दीपावली सणाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल उपराष्ट्रपती सी.पी.राधाकृष्णन यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले की ही जगन्मान्यता म्हणजे प्रत्येक भारतीयासाठी मोठ्या अभिमानाचा क्षण आहे.
समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात उपराष्ट्रपती म्हणतात की दीपावली हा केवळ एक सण नव्हे तर तो संपूर्ण देशाला एका धाग्यात एकत्र आणणारी आणि जगभरात प्रतिध्वनित होणारी नागरी संस्कृतीची एक रीत आहे. आशा, एकोपा यांचा आणि अधर्मावर धर्माच्या तसेच काळोखावर प्रकाशाने मिळवलेल्या विजयाचा कालातीत संदेश देतानाच हा उत्सव भारताचा बहुसंस्कृतीवाद, बहुविविधता तसेच सामाजिक ऐक्याला मूर्त रुपात साकार करतो असे त्यांनी नमूद केले.
हा सन्मान भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि त्यातील मानवतेसाठीच्या निरंतर संदेशाचा उत्सव साजरा करतो असे सांगत उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी हा बहुमान मिळाल्याबद्दल सर्व देशवासियांचे हार्दिक अभिनंदन केले.
नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2201644)
आगंतुक पटल : 19