पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत झालेल्या विशेष चर्चेमधील आपल्या विधानांची झलक पंतप्रधानांनी केली शेअर

प्रविष्टि तिथि: 08 DEC 2025 8:22PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2025

वंदे मातरम या गीताला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लोकसभेत झालेल्या विशेष चर्चेमधील आपल्या विधानांची झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केली आहे. 

“वंदे मातरम या जयघोष आणि मंत्राने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा आणि ऊर्जा दिली, त्याग आणि तपस्येचा मार्ग दाखवला त्याचे पुण्यस्मरण करणे हे आपल्या सर्वांचे सौभाग्य आहे", असे एक्स या समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

जेव्हा इंग्रजांचे राष्ट्रीय गीत घराघरात पोहोचवण्याचे षडयंत्र सुरू होते त्यावेळेस बंकिंगबाबूंनी आव्हान दिले आणि या राष्ट्रगीताचा जन्म झाला.

हजारो वर्षापासून भारतीयांच्या मनामनात वसलेल्या विचारांना या गीताने पुनर्जन्म दिला.

भारतमातेच्या अगणित वीर सुपुत्रांनी वंदे मातरम गात गात फाशीचा दोर गळ्यात अडकवला. शेवटच्या श्वासापर्यंत वंदे मातरम हाच त्यांचा जयघोष होता.

वंदे मातरम ने भारताला स्वावलंबनाचा मार्गही दाखवला. हा बाहेरील कंपन्यांना आव्हान देण्याचा मंत्र झाला.ज्यामध्ये स्वातंत्र्याचा मंत्र हा स्वदेशीचाही मंत्र झाला.

एवढ्या महान वंदे मातरमसोबत गेल्या शतकात अन्याय व विश्वासघात का झाला, हे आता जाणून घेणे म्हणूनच गरजेचे आहे.

तुष्टीकरणाच्या राजकारणाचा दबाव म्हणून वंदे मातरमचे विभाजन करण्याकडे काँग्रेस झुकली त्याचाच परिणाम म्हणून देशाच्या विभाजनासाठी काँग्रेसला झुकावे लागले.


नितीन फुल्लुके/विजया सहजराव/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2200613) आगंतुक पटल : 8
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Telugu , Malayalam